Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»अमळनेरला प्रताप महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाची सांगता
    अमळनेर

    अमळनेरला प्रताप महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाची सांगता

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 19, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

    येथील प्रताप महाविद्यालय आणि फॉर्मसी कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय स्नेहसंमेलनाची यशस्वी सांगता झाली. स्नेहसंमेलनातील विविध कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन राजेश पांडे (सदस्य : राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अध्यक्षस्थानी ना.अनिल पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री) होते.

    यावेळी खा. शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, उपाध्यक्षा माधुरी पाटील, विश्‍वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक हरी भिका वाणी, सीए नीरज अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य विनोद पाटील, चिटणीस तथा प्राचार्य डॉ.ए.बी.जैन, सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ.जी.एच.निकुंभ, डॉ.कल्पना पाटील, डॉ.जयंत पटवर्धन, डॉ.व्ही.बी. मांटे, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.पराग पाटील(उपप्राचार्य), प्रा.डी.व्ही.भलकार, उपप्राचार्य प्रा.उल्हास मोरे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.सोनवणे, प्रा.रवींद्र माळी उपस्थित होते.

    प्राध्यापक प्रतिनिधी प्रा.आर.एम.पारधी, शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. स्नेहसंमेलनाच्या सुरूवातीला प्राचार्य डॉ.ए.बी.जैन आणि स्नेहसंमेलन प्रमुख यांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उद्घाटन झाले.

    याप्रसंगी ना. अनिल पाटील म्हणाले की, महाविद्यालयायीन जीवनात अभ्यासासोबत विविध कलागुणही आत्मसात करणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांनी बहुआयामी व्हावे, असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयायीन आठवणींना उजाळाही दिला. राजेश पांडे म्हणाले की, प्रताप महाविद्यालय हे तुमच्यात पैलू पाडण्याचे काम करते. योग्य वेळी योग्य ज्ञानार्जन करा. प्रताप महाविद्यालयाने आमच्यात विविध कार्याचे संस्कार रुजविले. त्यामुळे आम्ही घडलो, असे मत व्यक्त केले.

    दोन्ही दिवस विद्यार्थ्यांनी दुपारच्या सत्रात काव्यवाचन, फॅन्सी ड्रेस, एकांकिका, नृत्य असे विविध मनोरंजनपर कार्यक्रम सादर केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुरुषोत्तम करंडक एकांकिका ‘तो पाऊस आणि टाफेटा’ सादर केली.

    स्नेहसंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी समारोप समारंभ कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला ऑनलाईन स्वरूपात प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी वकील पद्मश्री ॲड.उज्ज्वल निकम उपस्थित होते. त्यांनी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच ॲड.सुशील अत्रे, ॲड.सुशील जैन, उद्योगपती मुकुंद विसपुते उपस्थित होते. ॲड.सुशील अत्रे यांनी सत्रात ‘आजचे वर्तमान आणि शिक्षण पद्धती’ यावर भाष्य केले. अध्यक्षस्थानी डॉ.अनिल शिंदे होते.

    स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात येते. यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष, कार्योपाध्यक्ष आणि सर्व कार्यकारी मंडळ, चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए.बी. जैन यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. पराग पाटील, प्रा. दिनेश भलकार, सर्व उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन डॉ.रमेश माने, प्रा.प्रतिमा लांडगे, प्रा.श्‍वेता पाटील तर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.एस.सोनवणे, प्रा.डी.व्ही.भलकार यांनी आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner:चार जणांकडून साईड न दिल्याच्या वादातून व्यापाऱ्याच्या कारची तोडफोड

    February 20, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026

    Amalner : पिळोदे गावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.