एकाग्रता अन्‌‍ स्मरणशक्ती हीच ‌‘यशाची गुरुकिल्ली‌’ : मानसोपचार तज्ज्ञ पूनम गेडाम

0
8

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या सहाय्याने उत्तम यश संपादन करता येते. म्हणूनच एकाग्रता आणि स्मरणशक्तीला ‌‘यशाची गुरुकिल्ली‌’ आहे, असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ पूनम गेडाम यांनी केले. येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनियरिंग ॲन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील करियर काउंसलिंग ॲण्ड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेल यांच्यातर्फे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘तणावमुक्त अभ्यास, सातत्य आणि एकाग्रता’ विषयावरील कार्यशाळेत त्या बोलत होते. अध्यक्षस्थानी रायसोनी इन्स्टिट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल होत्या. व्यासपीठावर ॲकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभाग प्रमुख प्रा. डॉ.कौस्तव मुखर्जी उपस्थित होते.

एकाग्रता वाढविण्याच्या टिप्स एकावेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करा, कोणतेही काम मन लावून व काम करताना आरामदायी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा, ज्या गोष्टीत मन एकाग्र करायचे आहे, ती सोडून आपले विचार दुसरीकडे भरकटू लागल्याचे लक्षात येताच स्वत:च स्वत:ला थांबवा, ध्यानधारणा (मेडिटेशन) करा, असेही पूनम गेडाम यांनी सांगितले.

एकाग्रता सुधारण्यासाठी काही टिप्स

एकाग्रता वाढविण्यासाठी कोडी सोडवणे, काही खेळ खेळणे उपयुक्त ठरू शकते. आपल्या हातातील पेन,पेन्सिल न उचलता वर्तमानपत्रातील एखाद्या लेखातील अमूक एखादे अक्षर किंवा स्वर मनाशी ठरवून त्या सगळ्यांभोवती वर्तुळ करणे, तीन-चार प्रकारच्या डाळी एकत्र करून त्या निवडून वेगवेगळ्या करणे, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता एखाद्या गोष्टीकडे, वस्तूकडे टक लावून पाहत राहणे आदींचा अवलंब करावा.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी डॉ.मुकेश अहिरराव, प्रा. डॉ.सरोज पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी यांनी कौतुक केले. प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन समन्वयक प्रा.डॉ.विशाल राणा तर प्रा.तन्मय भाले पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here