महामानवाच्या अर्धवट राहिलेल्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करा

0
48

मलकापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना भाजपा दलित आघाडीतर्फे निवेदन

साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :

रेल्वे स्टेशनजवळील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अर्धवट सौंदर्यीकरण झाले आहे. उर्वरित पुतळ्याचे काम त्वरित पूर्ण करा, अशा आशयाचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना भारतीय जनता पार्टी दलित आघाडीचे शहराध्यक्ष कुणाल सावळे यांनी नुकतेच दिले आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनावर कुणाल सावळे, बाळू सावळे, अमित अवसरमोल, अर्जुन थाटे, राहुल अवसरमोल, आशिष चोपडे, अमोल रणीत, ज्वाला सिंग, पवन अवसरमोल, किरण सावळे व राहुल पानपाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

निवेदनात पुढे नमूद केले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्याचे अर्धवट झालेले काम गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित आहे. यासंदर्भात नगर परिषदेचे प्रशासक तथा तहसीलदार यांना वेळोवेळी निवेदने देवूनही आजतागायत उर्वरित सौंदर्यीकरणाचे काम झालेले नाही. गेल्या २८ ऑक्टोबर २०२२ रोजी भाजपा दलित आघाडीच्यावतीने प्रशासक तथा तहसीलदार यांना याबाबत निवेदनही दिले होते. परंतु तरीही पुतळ्याचे उर्वरित राहिलेले सौंदर्यीकरणाचे काम झालेले नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

तीन वर्षापासून उर्वरित पुतळ्याचे काम प्रलंबित

अनेक राजकीय, सामाजिक कार्यक्रमाच्यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मानवंदना आणि माल्यार्पण करण्यासाठी शेकडो नागरिक तेथे ये-जा करीत असतात. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून पुतळ्याचे सौंदर्यीकरण का झाले नाही, अशी ओरड भीम सैनिकांमधून होत आहे. भीम सैनिकांच्या संयमाचा आणि सहनशिलतेचा बांध फुटला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे न.प. मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी आपल्या स्तरावरुन लवकरात लवकर तातडीने उर्वरित राहिलेल्या सौंदर्यीकरणाबाबत योग्य ती कारवाई करुन उर्वरित राहिलेले काम पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here