
प्रभाग पाच : माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या अडचणीत वाढ
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील माजी महापौर विष्णू भंगाळे यांचे निकटवर्तीय मित्र परिवाराचे मोठ्या प्रमाणावर असलेले बोगस मतदारांच्यावर हजारोंच्या संख्येने तक्रारदार स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांचे चिरंजीव ॲड.पियुष पाटील यांच्याकडून तक्रार, हरकत नोंदवण्यात आली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. बोगस मतदारांसंदर्भातील जिल्ह्यातील सर्वात जास्त तक्रारी पाटील यांच्याकडून दाखल केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत मनपात जोरदार चर्चा रंगली होती. तसेच हा विषय चर्चेचा ठरला होता. विशेष म्हणजे संपूर्ण हरकतींचे पुरावे पाटील यांनी सादर केलेले असल्याने विष्णू भंगाळे यांच्या अडचणी चांगलीच वाढ झालेली असल्याचे बोलले जात आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त/प्रशासक तसेच जळगाव मनपा निवडणूक उपायुक्त यांना देखील लेखी स्वरुपाची पुराव्यानिशी तक्रार देण्यात आली. याबाबत ॲड. पियुष नरेंद्र पाटील यांनी राज्य तसेच केंद्रीय निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त गेडाम नाशिक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.
२०१३ मध्ये स्व. नरेंद्रअण्णा पाटील यांच्या तक्रारीवरून प्रभागात स्पॉट वेरिफिकेशन करून तब्बल ३ हजार ८०० बोगस मतदार जे जागेवर आढळून आले नाही हे चिन्हांकित केले होते. त्यावेळी संबंधित चिन्हांकित मतदारांना आपल्या रहिवासाचा ४ पुरावे अनिवार्य केले होते. तेव्हा केव्हा एकूण ३ हजार ८०० चिन्हांकित असलेल्या बोगस मतदारांपैकी केवळ ६ मतदारच पुरावे आणू शकले होते. मतदार करू शकले होते. परंतु आता नुकताच मनपाची प्रसिद्ध झालेली प्रारूप मतदार यादीमध्ये नावावरील चिन्हे हे अचानकपणे काढण्यात आलेले असल्याने निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण होत आहे. याबाबत न्याय न मिळाल्यास न्यायालयीन लढा देण्याची तयारी ठेवलेली आहे.
विष्णू भंगाळेंकडून पदाचा दुरुपयोग
जळगाव शहर महानगरपालिकेचे विष्णू भंगाळे हे माजी महापौर राहिलेले आहेत. तसेच ते आज रोजी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष असल्याने ते आपल्या पदाचा दुरुपयोग करीत आहे. त्यांना सत्तेची – पैशांची मस्ती आली असल्याचा हा प्रकार आहे. चिन्ह वगळत असताना कुठलीही व्हेरिफिकेशन आदी झालेले नसल्याने हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.


