‘पंटरला’ अभय देणारा एक अधिकारीही अडचणीत येणार
साईमत/यावल/प्रतिनिधी
तालुक्यातील ‘अधिकाऱ्यांना काही पदाधिकाऱ्यांकडून दिला जातोय हेतू पुरस्कार त्रास शांतता समितीच्या बैठकीतील चर्चेतून उमटला सूर; अधिकाऱ्यांतर्फे चौकशी करून पक्षांतर्गत कारवाईची गरज’ असे वस्तुस्थितीजन्य वृत्त दैनिक ‘साईमत’मध्ये प्रसिद्ध होताच एका अधिकाऱ्याच्या पंटरने, दलालाने आणि व त्याच्या अन्य ॲडमिन साथीदारांनी व्हाॅट्सॲप ग्रुपमधून ज्ञानाची सूचना केली. हे ज्ञान लक्षात घेता तो ॲडमिनही घरात घुसतांना ज्ञानाचा वापर करतो का…? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे ‘त्या’ ॲडमिनच्या मुळावर आघात झाल्याने तसेच एका व्यवसायातून माजी नगराध्यक्षांनी हकालपट्टी केल्याने तसेच शांतता समितीच्या बैठकीत सर्वांसमक्ष दोन सदस्यांनी दलालाचा पान उतारा केल्याने ‘त्या’ ॲडमिनचा संताप अनावर झाला आहे. या संतापातून व्हाॅट्सॲप ग्रुपमध्ये असलेल्या ॲडमिनच्या छत्रछायेमुळे बदनामी सुरू झाल्याने सायबर क्राईमकडे याबाबत तक्रार करून लवकरच कारवाई केली जाणार आहे.
या ॲडमिनने आतापर्यंत खोट्या तक्रारी केल्याचे पुरावेही समोर आले आहेत. शांतता समितीच्या बैठकीत जे घडले त्याचे वृत्त देणे हे चुकीचे आहे का…? संभाजीनगर येथील न्यायालयात या पंटरबाबत आणि ‘त्या’ एका अधिकाऱ्याबाबत न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याने हा ‘पंटर’ केसेस मागे घेण्यासाठी व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून दमदाटी, धमकी देत असल्याने यासोबत त्याला नेहमी अभय देणारा एक अधिकारीही अडचणीत येणार असल्याचे यावल शहरात चर्चिले जात आहे.