नांदुरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई द्या

0
46

साईमत नांदुरा प्रतिनिधी

नांदुरा तालुक्यात २३ सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य परिस्थीतीमुळे शेतपीक व पशुधनाची प्रचंड हानी झाली आहे. या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून या आशयाचे निवेदन नांदुरा तहसीलदार यांना देण्यात आले.

नांदुरा तालुक्यात २३ सप्टेंबरच्या रात्री ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन नदी नाले एक झाले व लोणवाडी या गावातील अमोल भीमराव सोळंके यांचा १ बैल, २ म्हशी मृत झाल्या व ३ म्हशी बेपत्ता झाल्या, शत्रुघ्न वामनराव सोळंके यांच्या १ गाय, १ गोरा व १ वासरी मृत पावली व ३ गायी पुरात वाहुन गेल्या, अवचितरावं त्र्यंबकराव सोळंके यांच्या २ म्हशी, ३ गाय आणी वासरी मृत पावली, पंजाबराव त्र्यंबकराव सोळंके यांची १ गाय १ म्हैस मृत पावली व १ म्हैस बेपत्ता झाली आहे. अचानक आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाची जिवीत हानी झाली असून ज्ञानगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या वडाळी गावाच्या पुलावरून पावसाचे पाणी ओसांडून वाहत असल्यामुळे या मार्गावरील वडगांव, धानोरा, वासाडी, वळती, बरफगांव, मुरंबा, माळेगांव गोंड व महाळुंगी या गावांचा संपर्क बराच वेळ तुटला व शेतात पाणी घुसुन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व काही शेतातील विहीरी खचल्या आहेत.

तसेच ज्ञानगंगा नदीच्या तीरावर समोरील अवधा बुद्रुक या गावाचा सुद्धा संपर्क तुटला आहे. पावसाने अचानक धारण केलेल्या रौद्ररुपामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने शासनाने तात्काळ सदर नैसर्गिक आपत्तीची दखल घेऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई व लोणवाडी येथील पुरामुळे मृत पावलेल्या व वाहुन गेलेल्या जनावरांचे प्रती गाय ५० हजार रुपये व प्रति म्हैस १ लाख रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना मदत करावी करावी. जेणेकरुन या अस्मानी संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा उभा राहु शकेल या आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीने नांदुरा तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक रमेश भिकाजी पाटील, संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष योगेश पाटील,जिल्हा सचिव शरद पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश सोळंके,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील, ,तालुका मार्गदर्शक विनोद वनारे ,तालुका उपाध्यक्ष दिलीप कोल्हे,तालुका कार्याध्यक्ष संतोष सोळंके,इसापूर शाखा सचिव मधुसूदन पुंडकर,नांदुरा शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर,माणिकराव सोळंके,गणेश बोचे,अमोल सोळंके,जावेद अहमद खान, फकरोद्दिन अजमोद्दीन,प्रतीक गोपाळ सोळंके,सागर मानकर,संतोष बोचरे,आशिष पाटील,दिलीप मुकुंद,अमोल तायडे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here