Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»सर्व जाती धर्माचे समाज बांधव गुण्या गोविंदाने राहतात अभिमानाची बाब
    भुसावळ

    सर्व जाती धर्माचे समाज बांधव गुण्या गोविंदाने राहतात अभिमानाची बाब

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoApril 3, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

    भुसावळ जंक्शन शहर हे खऱ्या अर्थाने ‘मिनी हिंदुस्तान’ आहे. त्याचे एक नाही अनेक उदाहरणे आहेत. सर्व जातीचे लोक येथे गुण्या गोविंदाने राहतात. आजपर्यंतच्या इतिहासात कधीही जातीय तेढ निर्माण झाली, अशी घटना शहरात घडली नाही, ही अभिमानाची बाब आहे. तसेच नेहमीच भुसावळकरांचे पोलीस प्रशासनाला सहकार्य असते, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक महेश्‍वर रेड्डी यांनी केले. रिंग रोड येथील शिखर इन्स्टिट्युट येथे जळगाव जिल्हा पोलीस, भुसावळ उपविभाग व शिखर ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने आयोजित इफ्तार पार्टीत ते बोलत होते.

    याप्रसंगी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, तहसीलदार नीता लबडे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन, शहरचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन जगताप, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. संदीप पानझाडे यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते.

    शहरात जातीय सलोखा निर्माण व्हावा, भाईचारा रहावा, शांतता नांदावी, पोलीस कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावे तसेच लोकसभेच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या आचारसंहितेचा कुठलाही भंग होणार नाही. त्याची दक्षता घेत सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षक महेशवर रेड्डी यांनी केले.

    ईद आनंदाने साजरी करा

    येत्या आठ दिवसांमध्ये रमजान ईद साजरी होणार आहे. त्यातही समाज ईदही मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी करा, असेही आवाहन त्यांनी शेवटी केले.

    रोजदारांसाठी अल्पोहाराची व्यवस्था

    रोजा इफ्तार पार्टीत उपस्थित शेकडो रोजदारांसाठी फळ, अल्पोहार, सरबत, शितपेय आदींची व्यवस्था केली होती.शिखर एनजीओचे अध्यक्ष रफिक शेख, उपाध्यक्ष वासेफ पटेल, जिल्हाध्यक्ष जाकिर शेख, खलील मन्यार, संजय पाटील, सय्यद मोहम्मद, शकील अली, फहीम शेख, जुनेद खान, शबिर अहमद, मुजाहिद तडवी साजिद कुरेशी आदींनी परिश्रम घेतले.

    सामाजिक कार्यकर्ता मुकेश गुंजाळचा सन्मान

    सामाजिक कार्यकर्ते मुकेश गुंजाळ हे दरवर्षी शिवजयंतीची मिरवणूक खडका रोड, जाम मोहल्ला भागातून काढतात. मात्र यंदा आचारसंहिता, मुस्लिम समाज बांधवांचा रमजान महिना असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. ही बाब पोलीस प्रशासनाने गुंजाळ यांना सांगितल्यावर त्यांनी लगेच पोलीस प्रशासनास सहकार्य करत शिवजयंतीची मिरवणूक रद्द केली. याबद्दल गुंजाळ यांचा पोलीस अधीक्षक रेड्डी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhusawal : साकेगाव येथील नवोदय विद्यालयाच्या सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा

    February 5, 2026

    Bhusawal : १० लाखांची आर्थिक फसवणूक आणि धमक्या

    February 4, 2026

    Bhusawal : संतोषी माता सभागृहाचा ताबा भुसावळ नगरपालिकेकडे

    February 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.