Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»राजकारणात संपर्क हीच सर्वात मोठी ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील
    जळगाव

    राजकारणात संपर्क हीच सर्वात मोठी ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    SaimatBy SaimatJanuary 7, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    राजकारणातील कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत संपर्क हा अतिशय महत्वाचा असून ही राजकारणात मोठी ताकद आहे. पक्ष संघटनेसाठी मंत्री पेक्षा मी कार्यकर्ता आहे. ”शाखा हा शिवसेनेचा महत्वाचा घटक असून प्रत्येक शाखेचा व विकास कामांचा फलक हा गावात लागलाच पाहिजे” फलक हा शिवसेनेचा आरसा आहे असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते पक्षाच्या लोकसभा मेळाव्यात बोलत होते. यावेळी लवकरच जळगावात पक्षाचे मध्यवर्ती जिल्हा कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

    लोकसभेसाठी जिल्ह्यात पुरक वातावरण असून आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांसाठी कार्यकर्त्यांनी संघटनात्मक काम करण्यासाठी एकत्र येवून सज्ज राहावे असे आवाहन नूतन संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांनी केले. पालकमंत्री व संपर्क प्रमुख यांनी जिल्ह्यात रुग्णसेवेचे काम कौतुकास्पद आहे. अजिंठा विश्राम गृहात जळगाव शिवसेना लोकसभेचा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.त्या प्रसंगी मान्यवर बोलत होते.
    मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सुनिल चौधरी हे होते. यावेळी आ. किशोरआप्पा पाटील, जिल्हाप्रमुख निलेश पाटील, रावसाहेब पाटील, वासुदेव पाटील , महिला आघाडीच्या सरीताताई कोल्हे- माळी , जळगाव लोकसभा मतदार संघातील धरणगाव, जळगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर व चाळीसगाव तालुक्यातील शिवसेना, युवासेनेचे सर्व तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख , तालुकास्तरीय पदाधिकारी आणि सरपंच कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविकात तिन्ही जिल्हा प्रमुख निलेश पाटील, वासुदेव पाटील व रावसाहेब पाटील यांनी जळगाव लोकसभेतील संघटना बांधणी, झालेली विकास कामे व बुथरचना बाबत विस्तृत माहिती विषद केली. तसेच सूत्रसंचालन निलेश पाटील यांनी केले तर आभार महिला जिल्हा प्रमुख सरीताताई कोल्हे – माळी यांनी मानले.
    याप्रसंगी पत्रकार दिनानिमित्त उपस्थित पत्रकारांच्या हातून केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वांनी सज्ज राहण्याची गरज असून शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचे कार्य हे पक्षाला बळ देणारे असले पाहिजे. जुन्या शिवसैनिकांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेवून राज्य शासनाने केलेल्या कामांची माहिती ही जनतेपर्यंत पोहचवा आवाहन केले. जळगाव लोकसभा मतदार संघात शिवसेनेची अतिशय मजबूत स्थिती जास्तीत जास्त सरपंच, पंचायत समिती आदींसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचे वर्चस्व असून शिवसेनेचे ३ आमदार व ५ पंचायत समिती सभापती असून झेडपीचे १५ सदस्य असल्याने जळगाव लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी आग्रही राहणार असल्याचे सांगितले. तर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा मतदार संघात केलेल्या विकास कामांची व पक्ष संघटना बांधणी बाबत सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यात विधानसभा मतदार संघ निहाय संपर्क प्रमुख नेमण्याची मागणी ही त्यांनी केली.
    सुरुवातीला नवनियुक्त अंबरनाथ येथील माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची जळगाव लोकसभेच्या संपर्क प्रमुख पदी निवड झाल्याबाद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील व जिल्हा प्रमुख यांनी यांनी सत्कार केला. या प्रसंगी जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिपक चौधरी , डॉ. सुषमा चौधरी तसेच पाचोरा तालुक्यातील खाजोळा येथील कार्यकर्ते रवींद्र पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री व संपर्क प्रमुख यांच्या उपस्थितीत प्रेवेश केला. त्यांचा ना. गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख सुनील चौधरी व आ. किशोर आप्पा पाटील यांनी सत्कार केला.

    आगामी निवडणूकांसाठी सज्ज रहावे- जिल्हासंपर्क प्रमुख सुनिल चौधरी

    लोकसभेसाठी जिल्ह्यात पुरक वातावरण असून आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांसाठी कार्यकर्त्यांनी संघटनात्मक काम करण्यासाठी एकत्र येवून सज्ज राहावे , प्रत्येक तालुक्यातील संघटना बांधणीसाठी शाखा नुतनीकरण करा, पंचायत समिती गणात बैठका घ्या, शिवसैनिक नोंदणीकरून गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक नोंदणी करण्याचे आवाहन करून लवकरच शिवसेना पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करणार असल्याचे सुतोवाच शिंदे गटाचे नवनियुक्त जिल्हासंपर्कप्रमुख सुनिल चौधरी यांनी केले. जळगाव लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी आग्रही राहणार असल्याचेही सुनिल चौधरी यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगावात ८ मार्चला भव्य रक्तदान शिबिर

    March 7, 2026

    Muktainagar: मुक्ताईनगरची कन्या मोहिनी जगताप UPSC मध्ये मिळवते ऐतिहासिक यश

    March 7, 2026

    Jalgaon : जळगावच्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करून तब्बल ५.९५ लाख उकळले

    March 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.