आधुनिक युगात मुलांसोबत पालकांनी संवाद साधणे काळाची गरज

0
80

जामनेरातील कार्यशाळेत समुपदेशक चंद्रशेखर गुलवाडे यांचे प्रतिपादन

साईमत/जामनेर/प्रतिनिधी

मुलींचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद साधणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय ट्रेनर चंद्रशेखर गुलवाडे यांनी केले. जामनेरातील पारसनाथ देवस्थान आणि भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींसाठी ‘बेटीयों का सक्षमीकरण स्मार्ट गर्ल’ कार्यशाळा त्यागी भवन, पारसनाथ देवस्थान येथे नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यासाठी बी.जे. एस. पुणेतर्फे अमरावती येथील राष्ट्रीय ट्रेनर चंद्रशेखर गुलवाडे तसेच कोल्हापूर येथील रमेश पाटील हे प्रशिक्षक म्हणून लाभले होते. कार्यशाळेत १३ ते २१ वर्ष वयोगटातील पुणे कार्यालयात नोंदणी झालेल्या ३४ मुली सहभागी झाल्या होत्या.

कार्यशाळेत स्व-जागृती, संवाद कौशल्य, मासिक पाळी स्वच्छता व आरोग्य, स्वसंरक्षण, मैत्री, पालक संवाद, नवी आव्हाने याविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थींसोबत पालकांनाही आमंत्रित केले होते. याप्रसंगी मुली व पालकांमध्ये झालेल्या सुसंवादाने उपस्थितांचे डोळे पाणावले. कार्यशाळेचा मुलींना भावी जीवनात निश्चितच उपयोग होणार आहे, असा विश्वास पारसनाथ देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश सैतवाल यांनी व्यक्त केला.

मुलींमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे पालकांचे मत

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला सोनटक्के, भारतीय जैन संघटनेच्यावतीने संगिता मंडालेचा, मोना चोरडीया, कांचन कुचेरीया, निता लोढा, विकास कोठारी उपस्थित होते. याप्रसंगी खुशी निरखे, मोनाली जैन, अक्षरा सैतवाल तसेच पालकांतर्फे मेघा जैन यांनी मनोगत व्यक्त करुन आमच्या मुलींमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे मत व्यक्त केले.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी सुरेखा सुर्यवंशी, संगिता कस्तुरे, किरण मिटकर, भरत सैतवाल, संजीव सैतवाल, प्रशांत सैतवाल, राजेश डिकेकर, रवींद्र जैन, राजेंद्र खोबरे, रवींद्र मिटकर, सुदर्शन सैतवाल, पारसनाथ देवस्थानचे संचालक यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सैतवाल, सूत्रसंचालन सुनीता सैतवाल तर आभार सचिव राजेंद्र नारळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here