मराठीला समृद्ध करण्यात सामान्य माणसाचा वाटा महत्वाचा- धनंजय गुडसूरकर

0
17

साईमत जळगाव / ( रानकवी ना. धो महानोर व्यासपीठ)  प्रतिनिधी

“मराठीला आपण जगविण्याची गरज नाही , आपल्या जगण्यासाठी मराठी जगली पाहिजे हा दृष्टीकोन आपण स्विकारला पाहिजे, मराठीला समृद्ध करण्यात सामान्य माणूसच महत्वाचा आहे”असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी व्यक्त केली.

पवन चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. पुरुषोत्तम नारखेडे स्मृती सतराव्या बहिणाई सोपानदेव खानदेश संमेलनाचे उद्घाटन गुडसूरकर यांच्या हस्ते दि .११ रोजी झाले.

संमेलनाचे अध्यक्षस्थानी डॉ. संजीवकुमार सोनवणे होते. व्यासपिठावर माजी महापौर विष्णूभाऊ भंगाळे, जयश्रीताई महाजन, स्वागताध्यक्ष अरविंद नारखेडे, उपप्राचार्य वा. ना . आंधळे,जेष्ठ कवी शशिकांत हिंगोणेकर, पुर्णिमा हुंडीवाले, बी. के चौधरी, डॉ . विलास नारखेडे , लिलाधर नारखेडे, रघुनाथ राणे, प्रतिभा खडके उपस्थित होते. प्रा संध्या महाजन यांनी प्रास्तविक केले.

“बोलीभाषेत समाजाच्या संस्कृतीचे अंग असते, संस्कृती ही समाजाचा अस्मिता असते, त्यासाठी बोलीभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे ” असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ . संजीवकुमार सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणात केले . “बोलीभाषेचा शास्रीय अभ्यास कठीण असला तरी तो आवश्यक असल्याचे डॉ. सोनवणे म्हणाले.
बोलीभाषेतून गांभिर्याने लेखन करण्याची गरज व्यक्त करून वाचनसंस्कृतीबाबत गळे काढून न रडता त्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी महापौर जयश्रीताई महाजन यांनी केले. साहित्यिकांनी एकत्र येऊन साहित्य क्षेत्रातील विषयांवर चर्चा करण्याची गरज असल्याचे त्या शेवटी म्हणाल्या. प्रारंभी ग्रंथदिंडी काढण्यात आली. ज्योती राणे यांनी सुत्रसंचालन तर प्रा. संध्या महाजन यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here