भुसावळ : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षणापासून कुणी वंचित राहू नये म्हणून वयोगट 6 ते 18 च्या शाळाबाह्य मुला मुलींचे सर्वेक्षण करून शाळाबाह्य आढळणाऱ्या मुला मुलींना वयानुरूप शाळेत दाखल करावे असे असताना शाळाबाह्य विद्यार्थी यांना शाळेच्या प्रवाहात आणले जाते परंतु पुन्हा एक-दोन वर्षात ते शाळाबाह्य होतात असे अनुभव येत असतो. मात्र यास अपवाद ठरत भुसावळच्या युक्ती चोरडिया या शाळाबाह्य विद्यार्थीनीने शिक्षण प्रवाह येऊन दहावीच्या परीक्षेत 75 टक्के गुण मिळवत गरुड भरारी भरारी घेतली आहे. दरम्यान , मिशन झिरो ड्रॉप उपक्रमाचे युक्ती चोरडिया जिल्ह्यातील रोल मॉडेल ठरू शकते अशी प्रतिक्रीया शिक्षण क्षेत्रात उमटत आहे.
शिक्षण प्रवाहात विद्यार्थी निरंतर टिकला पाहिजे असे असताना त्याच्या काही कारणांमुळे ते विद्यार्थी टिकत नाही शासन दरवर्षी मात्र शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करावयास लावून त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असते आताही शासनाचे मिशन झिरो ड्रॉप आउट अंतर्गत 20 जुलै पर्यंत अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षण प्रवाह आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत .
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील युक्ती चोरडिया या विद्यार्थिनीने तिसरी नंतर काही कारणाने ती शाळा बाह्य झाली होती सर्वेक्षण करत असताना नाना पाटील सर यांनी सदर विद्यार्थिनीला आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता सांगून शाळेत प्रवेश घेण्याविषयी आग्रह धरला . जिल्हा बालरक्षक समन्वयक डायटचे अधिकारी शैलेश पाटील, संजय गायकवाड, नाना पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी कन्या विद्यालयात वयानुरूप इयत्ता सातवी मध्ये प्रवेश दाखल करण्यात आला. चार वर्षांपूर्वी शिक्षणाच्या प्रवाहात आलेली युक्ती चोरडीया ही विद्यार्थिनी ने आज यशस्वीपणे दहावी मध्ये 75 टक्के गुण मिळविले आणि रेगुलर अकरावी मध्ये प्रवेश देखील घेतला शाळाबाह्य विभागाचे जिल्हा समन्वय डायट चे व्याख्याते शैलेश पाटील यांनी नुकताच शाळेत येऊन तिचा सत्कार केला. त्यावेळी ते म्हणाले की,अहिल्यादेवी कन्या विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये असलेली शाळाबाह्य विद्यार्थिनीने शिक्षण प्रवाहात येऊन इयत्ता दहावी 75 टक्के गुण मिळवून यशस्वी झाली ती आपल्या जिल्ह्याची शाळा बाहय विद्यार्थ्यांसाठी रोल मॉडेल ठरू शकते यावेळी त्यांनी तिचा व पालक गौतमचंद चोरडीया यांचा सत्कार केला.
त्यावेळी युक्ती चोरडीया ने संगीत क्षेत्रात आपण करीअर करणार असल्याचे सांगितले. व्याख्याते शैलेष पाटील यांनी सगळ्यांनाच आव्हान केले आपल्या परिसरात शाळाबाह्य मुलं मुली असतील तर त्यांच्याशी संपर्क करा व शाळेत नाव दाखल करा असे आवाहन केले युक्ती चोरडिया वर शाळेने विशेष केलेले प्रयत्न त्यामुळे तिला शिक्षणात निर्माण झालेली रुची हे पाहून त्यांनी शाळेचे देखील कौतुक केले शाळेचे शिक्षक नाना पाटील सर यांच्या प्रयत्नाने युक्ती चोरडिया ला शिक्षण प्रवाहात आणले गेले तसेच त्यांनी अजूनही चार शाळाबाह्य मुला मुलींना शिक्षण प्रवाहात आणले आहे त्यांचेही अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नाना पाटील सर यांनी केले तर सोनाली वासकर यांनी आभार मानले यावेळी युक्तीचे पालक गौतमचंद इंदरचंद चोरडिया यांनी डायटचे अधिकारी शैलेश पाटील बीआरसी चे संजय गायकवाड यांचे विशेष आभार मानून शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांचेही त्यांनी आभार मानले. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक संजीव पाटील सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.