कांचन नगरात विविध विकास कामाचा प्रारंभ

0
40

साईमत, जळगाव ः प्रतिनिधी

जागतिक आदिवासी दिनानिमित्त कांचन नगर वार्ड क्र. २ (अ)आदिवासी वार्डच्या नगरसेविका कांचनताई सोनवणे यांनी नारळ फोडून,पूजा करुन,पेढे वाटप करून उत्साहमय वातावरणात त्यांच्या हस्ते वार्डातील विविध विकास कामांचा प्रारंभ केला.या परिसरात कॉक्रिटीकरण, गटारी, कॉक्रिटीकरण रोडांचे पेव्हर ब्लॉक बसविण्याचे तसेच वार्डातील १० ते १२ ठिकाणी पाणी गाड्या इत्यादी विकास कामांची प्रत्यक्ष सुरुवात झाली. सदरची कामे शिव शंकरनगर व हरिओम, कांचन नगर, घरकुल परिसर,आसोदा रोड,प्रशांत चौक, उज्ज्वल चौक, बिंदुबाई हॉल या परिसरात करण्यात येत आहे. सदरहू कामे जिल्हा नियोजन,मनपा निधी,ठक्कर बाप्पा आदिवासी योजना निधी, ना. देवेंद्र फडणीस नगर परिसरात नागरी निधी अंतर्गत करण्यात येत आहेत. या कामांसाठी पाच कोटी रुपये ना. गिरीषभाऊ महाजन, पालकमंत्री ना.गुलाबभाऊ पाटील, आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले आहेत. विकास कामांच्या प्रारंभप्रसंगी राजेंंद्र कोळी, रवी पाटील, अशोक सोनवणे, रवींद्र सोनवणे, भगवान नन्नवरे, रुपेश सपकाळे, राजकिरण चौधरी, पंकज श्रीखंडे, सुकदेव सपकाळे, सुभाष वास्कर, अनिल कोळी, मंगलाबाई सोनवणे, इंदुबाई मराठे, सुंदरबाई सोनवणे, आशा सपकाळे, कविता कोळी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here