‘महोत्सव चित्रपटाचा सन्मान कलाकारांचा’ कार्यक्रमाला सुरुवात

0
58

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

‘महोत्सव चित्रपटाचा सन्मान कलाकारांचा’ कार्यक्रमाची सुरुवात १ मार्च २०२४ रोजी करण्यात आली. जळगाव शहरातील रंगकर्मीच्या कार्याची फोटोंची प्रदर्शनी नयनतारा मॉल येथे उभारण्यात आली आहे. याठिकाणी पाचव्या मजल्यावर स्टार सिनेमामध्ये रोज राष्ट्रीय पातळीचे पुरस्कार मिळविलेले काही दिग्गजही मार्गदर्शक म्हणून लाभले. अनेक शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल होतात. मात्र, महोत्सवात १ मार्च २०२४ रोजी ‘में अटल हूं’, ‘दिल, दोस्ती, दिवानगी’ नंतर भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीर दीक्षित, शिरीष राणे उपाध्यक्ष यांनी चर्चासत्र घेतले.

२ मार्च २०२४ रोजी ‘पिल्लू बॅचलर्स’, ‘सात सोबती’ ह्या चित्रपटानंतर लेखक-दिग्दर्शक तानाजी घाडगे, दिग्दर्शक, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रमेश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. ३ मार्च २०२४ रोजी ‘गुठली लड्डू’ ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा चित्रपट दाखविल्यानंतर अभिनेता-कास्टींग डिरेक्टर-लेखक प्रवीण चंद्रा, दिग्दर्शक-लेखक संदीप सावंत यांचेही मोलाचे तर एन.ललित यांचे केशभूषा व सौंदर्य प्रसाधन याबद्दलचे मार्गदर्शनपर बोलत मी गीतांजली ठाकरे यांच्या मदतीने जळगावात एकदिवसीय कार्यशाळा खास घेण्यासाठी येईल, असेही सांगितले.

प्रास्ताविकात प्रदेश सरचिटणीस गीतांजली ठाकरे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगत पुढील कार्य म्हणजे स्थानिक ज्येष्ठ रंगकर्मी यांचा फोटो स्थानिक नाट्यगृहात असलाच पाहिजे ह्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे, असे सांगितले. तसेच हा भारतातील पहिला कार्यक्रम आहे. ज्यात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट दाखविण्यात आले. त्याबद्दलचे मार्गदर्शन झाले. महत्त्वाचे म्हणजे स्थानिक रंगकर्मी यांची प्रदर्शनी आयोजित केली आहे. याबाबत आपणास काय वाटले त्यांचा अभिप्राय लिहिण्यासाठीही एक कोरा फलक लावण्यात आला आहे. अजून काही दिवस ही प्रदर्शनी तिथे सुरु असणार आहे. यासाठी आपला अभिप्राय नक्कीच नोंदवावा. गीतांजली यांनी हे सांगत खंत व्यक्त केली. काही विरोधी पार्टीचे कलाकार हा भाजपचा कार्यक्रम आहे. म्हणून मी नाही येणार आणि आम्हाला फोन करू नये, असेही अनेक उत्तरे त्यांना मिळाली. पण प्रदर्शनीत मात्र गीतांजली यांनी असा काही भेद ठेवलाच नव्हता हे प्रदर्शनीत जाणवले.

भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांनी सर्वांना शुभेच्छा देत आपण लवकरच गीतांजलीताई यांच्या मदतीने जळगावात फिल्म क्लब सुरू करून, फिल्म दालन सुरू करू व अभिनय कार्यशाळा ही आयोजित, ज्येष्ठ रंगकर्मी विचार संकलन (अनुभव) करू, असे म्हणाले. तसेच दिग्दर्शक रमेश मोरे म्हणाले की, जळगावचा प्रेक्षक जाणकार आहे. मराठी चित्रपटाची चांगलीच जाणती आहे. फ्रेम कसं लावलीपासून त्यांनी शिबिरात सांगितले.शिरीष राणे म्हणाले की, बस कॅमेरा आणला की शुट करावे इतके इथे आहे. प्रवीण चंद्रा यांनी ‘आप हमको टॅलेन्ट भेजो हम आपको मंच देंगे जिससे आपको मदत मिलेगी इस क्षेत्र में आने की’, असेही जळगाववासियांना सांगितले. संदीप सावंत म्हणाले, मलाही नक्कीच आवडेल इथली कला माझ्या लेखणीतून समोर आणण्याची, चित्रपट आघाडी प्रदेशाध्यक्ष समीर दीक्षित म्हणाले, हा भारतातील पहिला कार्यक्रम महाराष्ट्राचा रोल मोडल करू आणि इतरही जिल्ह्यात असे उपक्रम घेऊ, असे सांगितले.

जळगाव महानगरच्या अध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे म्हणाल्या की, इतके कलाकार शहरात आहे हे खरं तर गीतांजलीताई यांनी लावलेल्या प्रदर्शनीमधून सर्वांना जाणून घेण्यास मदत झाली. लाभलेल्या रंगकर्मीचा वारसा जपण्यासाठीचा प्रयत्न आहे. प्रदेश सरचिटणीस चित्रपट आघाडी संचित यादव हे दालन खरोखर स्थानिक कलाकारांच्या कामाची दखल आहे आणि त्यांच्या प्रती आदरच आहे.

स्थानिक कलाकारांचा सन्मान

कामगार मोर्चाचे जळगाव महानगराध्यक्ष सुनील वाघ, प्रदेश कामगार मोर्चाचे सचिव आशिष ढोमणे, प्रदेश सचिव भूषण पाटील, प्रदेश कामगार मोर्चाचे सदस्य कुमार सिरामे या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हातून स्थानिक कलाकारांचा सन्मान केला. कार्यक्रमासाठी नियोजन व मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी करण्याऱ्या चित्रपट कामगार आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस गीतांजली ठाकरे, चित्रपट आघाडीचे जळगाव महानगराध्यक्ष रोहित चौधरी, देवाशिष पाटील, शिवम पाटील, स्नेहल वाघ, भास्कर जुनागडे, ब्राम्हण सभेतील अभिमान तायडे यांना ना. गिरीष महाजन, खा. उन्मेष पाटील, महानगर अध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, आ. सुरेश भोळे (राजूमामा), कामगार मोर्चाचे प्रदेश सदस्य कुमार सिरामे यांच्या मदतीने कार्यक्रम यशस्वी झाला म्हणून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here