जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी हद्दतील कंजरवाडा परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवत हिस्ट्रीसिटरवरील 12 गुन्हेगारांना तपासण्यात आले. दरम्यान, या कारवाईत 7 जणांविरुध्द गुन्हे दाखल करत 95 हजार 500 रुपयांचा अवैध गावठी दारुचे रसायन नष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे यांच्या आदेशाने व एमआयडीसी पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी परिसरातील 12 हिस्ट्रीसिटर गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. हद्दपार केलेल्या 1 हिस्ट्रीसिटरचा तपास करण्यात आला. त्याचबरोबर रेकॉर्डवर असलेल्या सात गुन्हेगारांना शोधण्यात आले. यावेळी कंजरवाडा परिसरात पाच पोलिसांच्या टिम तयार करण्यात आली होती. या दरम्यान सात ठिकाणी धाडी टाकल्या असता.
सात आरोपींविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडे असणारे गावठी दारुसाठी लागणारे सुमारे 95 हजार 500 रुपये किंमतीचे रसायन यावेळी पोलिस पथकाने नष्ट केले. या कारवाईत पोलिस कर्मचारी अतुल वंजारी यांच्यासह एमआयडीसी पोलिस स्थानकाचे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.