Sub-Divisional Police : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस दलाचे कोंबिंग ऑपरेशन

0
8

समाज उपद्रवी समाजकंटकांना मोठा दणका

साईमत/यावल/प्रतिनिधी : 

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये यावल तालुक्यातील फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या कार्यक्षेत्रात यावल पोलीस स्टेशन अंतर्गत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्यासह संपूर्ण पोलीस दलाने शुक्रवार दि.२१ नोव्हेंबर रोजी सकाळी ४ वाजता अचानक कोंबिंग ऑपरेशन राबविले. यात समाज उपद्रवी समाजकंटक अशा संशयित आरोपी, नागरिकांविरुद्ध यशस्वीरित्या कारवाई करण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.

फैजपूर उपविभाग डीवायएसपी अनिल बडगुजर यांनी व पोलीस दलाने केलेल्या कारवाईनुसार प्रसिद्धी पत्रकानुसार पोलिसांना पाहिजे असलेला १ आरोपी, एनबीडब्ल्यूचे १० आरोपी, बीडब्ल्यू ६, समन्स बजावणी १४ , हिस्ट्रीसीटर ५ जणांची तपासणी, २ पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या गुन्हेगारांची तपासणी, शरीराविरुद्धचे गुन्हेगार व मालाविरुद्धचे २ पेक्षा जास्त गुन्हेगार असलेले एकूण २१ गुन्हेगारांचे तपासणी, दारूबंदीचे २ पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या ९ गुन्हेगार, हद्दपार केलेल्या ४ आरोपींची तपासणी यांच्यावर पोलिसांनी सकाळी ४ वाजता रामप्रहरी बेधडक कारवाई केल्याने तालुक्यात गुन्हेगारी क्षेत्रात आणि चुकीची कामे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फैजपूर उपविभागातील यावल, फैजपूर, रावेर येथे होणाऱ्या सार्वत्रिक नगर पालिका निवडणुकीची महत्वाची प्रकीया सुरू आहे. ही निवडणूक प्रकिया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडावी तसेथ उपविभागातील अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांवर कायद्याचा प्रभावी अंकुश कायम रहावा, त्यांच्याकडून निवडणूक प्रकीयेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता महेश्वर रेडडी साधे, पोलीस अधीक्षक यांचे आदेश व सुचनान्वये शुक्रवार दि.२१ रोजी पहाटे ४ ते ७ वाजेचे दरम्यान यावल पोलीस स्टेशन हद्दीतील यावान शहर, दहिगाव,साकळी,डांभुर्णी, किनगाव,अट्रावल,निमगाव, अंजाळे येथे कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले.सदर कोंबींग ऑपरेशन हे मा. महेश्वर रेडडी साधे, पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे आदेशान्वये मा.उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, फैजपूर उप-विभाग फैजपूर यांचे नेतृत्वात राबविण्यात आले. यात

उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, फैजपूर उपविभाग फैजपूर यांनी व फैजपूर उप विभागातील यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे व उपविभागातील ५ पोलीस अधिकारी आणि ३९ पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला. अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाच्या ५ वेगवेगळ्या टीम तयार करून एनबीडब्ल्यू , बीडब्ल्यू वॉरंटातील आरोपी तसेच हदपार, दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेले शरीराविरुद्धचे, मालाविरुद्धचे गुन्हेगार व अभिलेखावरील हिस्ट्रीशीटर, आरोपी तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उपद्रव करणाऱ्या रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची कसून तपासणी करण्यात आली.सदर कोंबीग ऑपरेशन दरम्यान तपासणी करण्यात आली.

आगामी निवडणूक प्रकीया निर्भीड व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की, या प्रक्रीयेत प्रशासनास सहकार्य करून आपण लोकशाहीतील महत्वाची प्रकीया पार पाडून लोकशाही बळकळ करावी, असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी नमूद केले आहे

01

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here