साईमत, जळगाव : प्रतिनिधी
येथील स्तंभ लेखिका तथा साहित्यिका मीना सैंदाणे यांचा मंगळवारी, २२ ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता जळगाव आकाशवाणीवर ‘कानबाई, रानबाई’ ह्या विषयावर खान्देशातील कानबाई उत्सव हा माहितीपर कार्यक्रम सादर होणार आहे. सादरकर्ते नरेंद्रकुमार ठाकुर असणार आहेत. सर्व श्रोते हा कार्यक्रम ‘न्युज ऑन एअर’ वर ऐकू शकता. त्यात श्रोत्यांना ‘कानबाई’ वर आधारित असलेली माहिती सोबत गाणी ऐकण्याचा लाभ घेता येईल. यापूर्वीही मीना सैंदाणे यांनी आकाशवाणीवर विविध कार्यक्रम सादर केले आहेत. गेल्या चार महिन्यांपूर्वी त्यांचा ‘आखाजी’ वर कार्यक्रम झाला होता. त्या विविध विषयांवर सतत लिखाण करीत असतात. त्यांचा जळगाव आकाशवाणीवर कार्यक्रम होणार असल्याने त्यांचे श्रोत्यांमधून कौतुक होत आहे. श्रोत्यांनी मंगळवारी कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.