रेशन धान्य दुकानदार अन्‌ पुरवठा अधिकाऱ्यांंचे संगनमत

0
45

अंत्योदय कार्ड बेकायदा रद्द केल्याचे उघड, कारवाईकडे लक्ष

साईमत/प्रतिनिधी/यावल :

येथील एक स्वस्त धान्य दुकानदार दर महिन्याला धान्य कमी देत असल्याची तक्रार एका ग्राहकाने केली म्हणून संबंधित रेशन दुकानदार आणि यावल पुरवठा अधिकारी यांनी संगनमत करून ग्राहकाला धडा शिकवण्याच्या कारणातून त्याचे रेशन कार्डच रद्द केल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या दालनात उघड झाल्याने त्या ग्राहकात आणि तक्रार करणाऱ्यांमुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून बेकायदा कारवाई करणाऱ्याविरुद्ध आता काय कारवाई होणार..? याकडे लक्ष लागून आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुकाध्यक्ष (अजित पवार गट) आकाश सतीश चोपडे यांनी ३० जुलै २०२४ जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली. तेव्हा उपजिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे यावल येथील पुरवठा अधिकारी अंकिता वाघमळे यांनी लाभार्थी यांची नावे सॉफ्टवेअरमधून यावल येथील योगेश नारायण पाटील यांचे कुठल्या नियमाद्वारे व कुठल्या तांत्रिक अडचणीद्वारे अंत्योदय कार्डचे नाव कमी केले.याबाबत कुठलीही माहिती न दिल्यामुळे डीएसओ रुपेश बिजेवार यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली. तेव्हा त्यांनी त्याच क्षणी यावल पुरवठा विभागातील अंकिता वाघमारे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. तेव्हा त्यांनी सांगितले की, स्वस्त दुकानदार याच्या सांगण्यावरून लाभार्थी योगेश नारायण पाटील यांचे नाव कमी केले होते. पुरवठा अधिकारी यांच्या यावल पुरवठा विभागाचे बेकायदा कृत्य लक्षात आले.

त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे ३० जुलै २०२४ रोजी लेखी निवेदन दिले. त्यात पुरवठा अधिकारी अंकिता वाघमारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यावल येथील रेशन दुकान नंबर ११० खान्देश महिला विकास संस्था, जळगाव अकीला मेहमूद पटेल यांच्यावर तात्काळ कारवाई करून दुकान निलंबित करण्यात यावे. तसेच यापूर्वी सर्वपक्षियांकडून निवेदन तक्रार देण्यात आलेली आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या आत तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष आकाश चोपडे, उपजिल्हाध्यक्ष जुगल पाटील,शहराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here