गुन्हेगारांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका ; दोन गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द

0
15
गुन्हेगारांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका ; दोन गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द
साईमत जळगाव प्रतिनिधी
जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीसह एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांना दणका देत दोघांना स्थानबध्द केले आहे. गेल्या नोव्हेंबरपासून ते आजतागायतत जिल्ह्यातील २१ विविध गुन्हेगारांना स्थानबध्द केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
यातील प्रकाश चंद्रकांत कंजर (वय ३४, रा. खंडेराव नगर, जळगाव) हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत आहे. त्याच्यावर आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला एक वर्षासाठी ठाणे येथील कारागृहात स्थानबध्द केले आहे. यासोबत सोनू रामेश्वर पांडे (वय २४, रा. मामाजी टॉकीज मागे, भुसावळ) याच्यावर आर्म अॅक्टसह सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला पुणे येथील कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे.
महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषयक, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट), वाळू तस्कर व काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम १९८१ ( महाराष्ट्राचा कायद्धा क्रमांक ५५ सन १९८१ ) सुधारणा अधिनियम २०१५ अंतर्गत या कारवाया केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here