पांझरापोळ गोशाळेचा परिसर “ गौ माता की जय ” घोषणांनी दणाणला
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा न्यायालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन “गोवत्स बारस”निमित्त “सामूहिक गौ सेवा-एक अनुष्ठान” उपक्रमांतर्गत सेवाभावी कार्य केले. यावेळी गौसेवाव्रती ॲड. विजय काबरा यांच्या आवाहनानुसार जिल्हा न्यायालयातील अनेक अधिकारी-कर्मचारी परिवारासह पांझरापोळ गोशाळेत उपस्थित राहिले. त्यांनी गौमातेचे पूजन करून तिला लापशी खाऊ घालत गौसेवा अर्पण केली. यावेळी “देशधर्म का नाता है, गौ हमारी माता है”, “गौ माता की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
याप्रसंगी ॲड. विजय काबरा यांनी उपस्थितांना गौसेवेचे धार्मिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक महत्त्व पटवून दिले. गौमातेचे पंचगव्य मानवी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. प्रत्येक घरातून दररोजची पहिली पोळी ‘गौ घास’ म्हणून गौमातेला अर्पण करा, म्हणजे कुटुंब सुखी आणि निरोगी राहील, असे त्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने न्यायालयीन कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या परिवारातील सदस्य सहभागी झाले होते. दरवर्षी वसुबारसच्या दिवशी गौसेवा करण्याचा संकल्प करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाला वसंत काळकर, प्रणिता काळकर, महेश कोल्हे, हर्षल क्षीरसागर, दीपक पुणेकर, संतोष बारी, गिरीश वाघळे, चंद्रकांत पाठक, प्रकाश शिंदे, प्रमिला शिंदे, तन्मय चौधरी, सुनील चौधरी, रमेश माळी, प्रकाश सोनार, निनाद सोनार, रवींद्र अहिरराव, सोहम अहिरराव, कल्पेश चंद्रात्रे, महेश कोठावदे, रवींद्र बोरनारे, सुरेश रोटे, राम गुरव, आर्या गुरव, आदित्य गुरव, भाऊसाहेब राजपूत, श्रीकांत पाटील, नयना पाटील, देवांश पाटील, हिमांशू पाटील, संदीप हरणे, धनश्री हरणे, सिद्धेश हरणे, नारायण वाणी, ईश्वर गुंडाळे, अपेक्षा गुंडाळे, मोहन त्रिवेदी, मंजिरी त्रिवेदी, राजेंद्र जोशी, योगिनी जोशी, प्रशांत निंबाळकर, पंकज चोपडे, एन. आर. पाटील आदी उपस्थित होते.