साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत चाळीसगाव महाविद्यालयात शुक्रवारी, १५ सप्टेंबर रोजी अमृत कलश संकलन उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एम.व्ही.बिल्दीकर यांनी अमृत कलश म्हणजे आपल्या मातीला, आपल्या देशाला आणि संस्कृतीला वंदन करणे आहे, असे प्रतिपादन केले. हा कलश आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. यावेळी प्राचार्यांनी एक मुठ माती कलशमध्ये टाकून सेल्फी घेतली आणि कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.ए.व्ही.काटे, उप प्राचार्य प्रा.डी.एल.वसईकर, उप प्राचार्य डॉ.खापर्डे, एन.एस.एस.प्रमुख प्रा. आर.आर.बोरसे, एन.एस.एस.सहा.अधिकारी प्रा.डी.बी.पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.दीपाली बंस्वाल, सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा.पंकज वाघमारे, डॉ.संजय सोनवणे, डॉ.समाधान जगताप, प्रा.रविंद्र पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी एन.एस.एस.स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन स्वत:चे सेल्फी ओनलाईन लिंकद्वारे अपलोड केले. यशस्वीतेसाठी शुभम पाटील, किरण निकम, नितीन शेवाळे, गायत्री मांडोळे, संजीवनी गढरी, संजना निकम, उमा गायकवाड, श्वेता केदार, हरीश बच्छाव, संदीप बागुल, वासुदेव सोनवणे, यशवंत मोरे, रोहित देवरे, योगेश महाले यांनी परिश्रम घेतले.