अवैध गॅस स्फोट प्रकरणातील जबाबदारांना सहआरोपी करा

0
13

समाजबांधवातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

शहरातील इच्छादेवी पोलीस चौकीजवळील अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर झालेल्या स्फोटातील काही पोलीस कर्मचारी तसेच या घटनेला कारणीभूत ठरलेल्या गॅस एजन्सीचे चालक, मालक यांना या गुन्ह्यात सहआरोपी करावे, अशा आशयाची मागणी राणा राजपूत समाज सुधारक मंडळ, समस्त राणा राजपूत समाज बांधव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदाद्वारे केली आहे.

इच्छादेवी पोलीस चौकीच्या १०० मीटरच्या अंतरावर अवैध गॅस रिफिलींग सेंटर दिवसाढवळ्या गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होते. स्फोटात भरत सोमनाथ दालवाला, सूरज भरत दालवाला, देवेश भरत दालवाला, रश्मी संजय दालवाला,संजय गणेश दालवाला, दानिश शेख, संदीप शेजवळ असा सात जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.या घटनेत इच्छादेवी पोलीस कर्मचारी जबाबदार आहे. त्यांना नोकरीतून बडतर्फ करून याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सहआरोपी करण्यात यावे, या घटनेला कारणीभूत ठरलेले गॅस सिलिंडर कोणत्या गॅस वितरक एजन्सीने पुरविले होते. त्याची सखोल चौकशी करावी, एजन्सीचे चालक, मालक यांनाही सहआरोपी करावे, त्यांच्या एजन्सीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा अहवाल जळगाव जिल्हाधिकारी यांना पाठवावा, अशी मागणी समाजबांधवांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here