मुख्यमंत्री शिंदेंची यांची यांनी केली या पदावरून हकालपट्टी

0
26

साईमत लाईव्ह

मुंबई : प्रतिनिधी

ठाकरे सरकाराच्या विरोधात बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या गोटातील अनेक आमदार फोडत भाजपसोबत युती करत नवीन सरकार स्थापन केले. मात्र शिंदे यांना शिवसेनेविरोधातील बंडखोरी भोवली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे शिंदेंवर कारवाईसंदर्भातील पत्रकात म्हणाले की, तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील ‘शिवसेना नेते’पदावरून दूर करत आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेविरोधात तोफ डागली.

दरम्यान दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, त्या दरम्यानच शिवसेना नेते हे शिवसेना पक्ष संघटनेतील अत्यंत मानाचे पद मानले जाते. या यादीत १२ व्यक्तींचा समावेश होता. मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, संजय राऊत, रामदास कदम, अनंत गीते, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे अशा नेत्यांचा समावेश होता. आता यातील सुधीर जोशी यांचे निधन झाले असून एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंनी बाहेरचा रस्ता दाखविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here