चाळीसगावात पाटबंधारेच्या लिपीकास १३ हजाराच्या लाचप्रकरणी अटक

0
19

चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील पाट बंधारे विभागातील एका लिपीकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने १३ हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
नांदगाव तालुक्यातील तक्रारदाराच्या आजोबाची शेत जमीनीत मन्याड धरणातून गाळ टाकण्यासाठी परवानगी मिळण्याकरिता बारा शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव यांच्याकडे अर्ज केला होता. यासाठी चाळीसगाव येथील उपविभाग विभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग या कार्यालयातील लिपिक तुषार अशोक पाटील यांनी तक्रारदाराकडे तेरा हजार तीनशे रुपयांच्या मागणीसाठी तगादा लावला. वास्तविक शेतकऱ्यांना मन्याड धरणातून शासनाकडून मोफत गाळ देण्यात येतो.
वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीला वैतागून संबंधिताने धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. धुळे लाचलुचपत विभागाने चाळीसगाव येथे जाऊन तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची पडताळणी करून तुषार पाटील याने १३ हजार रुपयांची मागणी केल्याचे सिद्ध झाल्याने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात केला आहे. एसीबीच्या पथकाने शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सापळा रचून लिपिक तुषार अशोक पाटील याला ताब्यात घेतले. ही कारवाई धुळे विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे यांनी सापळा रचला. कारवाई सिंग चव्हाण, रूपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण पाटील, प्रवीण मोरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर
यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here