स्वयंसेवकांना ‘माय भारत’चा लोगोच्या टोपीचे वाटप
साईमत/बोदवड/प्रतिनिधी :
येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत प्लास्टीक मुक्त महाविद्यालय- प्लास्टीकमुक्त भारत अभियान कार्यक्रम राबविण्यात आला.
अभियानाची सुरुवात रासेयोच्या लक्ष गीताने तर उद्घाटन स्वयंसेवकांना स्वच्छतेचे साहित्य देऊन करण्यात आले. याप्रसंगी स्वयंसेवकांना ‘माय भारत’चा लोगो असलेले टोपी वाटप करून स्वच्छतेची शपथ देण्यात आली. तसेच महाविद्यालय परिसर, महाविद्यालय ते तहसील कार्यालय परिसरातील स्वच्छता करून ४६ किलो प्लास्टीक कचरा जमा करून नगरपंचयातीच्या कचरा गाडीत पुढील विल्हेवाट लावण्यासाठी देण्यात आला. यावेळी स्वयंसेवकांनी ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ हा संदेश गावातील नागरिकांना दिला. उपक्रमास राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ११० स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी युवक खेळ कल्याण मंत्रालय नवी दिल्ली, राष्ट्रीय सेवा योजना (मंत्रालय कक्ष), उच्च व तंत्रशिक्षण विभाग मुंबई, प्रादेशिक संचालनालय पुणे, रासेयो विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचे सहकार्य लाभले. स्वच्छता मोहीम आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अरविंद चौधरी, उपपप्राचार्य प्रा. व्ही. पी. चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेससाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. नितेश सावदेकर, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. शरद पाटील, अतुल पाटील, राजेंद्र मोपारी यांच्यासह सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.