साईमत मलकापूर प्रतिनिधी
भुसावळ मंडळ मध्य रेल्वेच्या वतीने दि.15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्या अंतरर्गत मलकापूर शेतकरी संघटना व मलकापूर रेल्वे स्टेशन प्रबंधक यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी मलकापूर रेल्वे स्टेशन प्रबंधक डि.व्ही.ठाकुर यांनी स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अशा घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्टेशन प्रबंधक व्ही.डी.ठाकुर, स्टेशन उप प्रबंधक व्ही.डी.खेवलकर , स्वास्थ्य निरीक्षक संतोष गिरी , सि.जी.एस आर.पी.चौधरी, सफाई कर्मचारी अनीलजी डागोर सह अन्य रेल्वे कर्मचारी बाधावांनी सहकार्य केले.
यावेळी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा प्रमुख दामोदर शर्मा, युवा आघाडी जिल्हा प्रमुख रणजित डोसे , मलकापूर तालुका प्रमुख प्रतापसिंह राजपुत, ज्ञानदेव सातव, बाळुभाऊ वेरुळकार, हरीदासजी गणबास, बाबुराव पाटील, मुजाहदऊल्लाखां, ध्रुव पाटील, राजुभाऊ ठाकुर, बाळुभाऊ ठाकरे, दिलीपसिंह जाधव, गोपाल सातव, ईंद्रसिंह मोरे, गजानन तायडे, अशोक डांगे, महादेव बोपले, वसंता गव्हाळे, प्रल्हाद ठाकुर, दिनेश सुशीर , गणेश ठाकूर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.