साईमत/ न्यूज नेटवर्क/ जळगाव :
मनपाच्या आरोग्य विभागातर्फे फुले मार्केट, दाणा बाजार परिसरात रविवारी, १४ जुलै रोजी सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दोन पिकअप गाडी करुन चार ट्रीपात अंदाजे १० टन कचरा जमा करण्यात आले. वार्ड क्रमांक पाचमधील फुले मार्केट, दाणा बाजार, गांधी मार्केट तसेच दाणा बाजाराच्या मागील गल्लीत, कबूतर खाना परिसरात साफसफाई करण्यात आली. त्यात सुमारे १० टन कचरा जमा करण्यात आला.
स्वच्छता अभियानात मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, यु. आर. इंगळे, नागेश लोखंडे, युनिट प्रमुख सुरेश भालेराव, अजय चांगरे, मुकादम शरद पाटील, आनंद मरसाळे, मुकेश थांबेत, शंकर अंभोरे, इम्रान भिस्ती, किशोर भोई, मुकादम भीमराव सपकाळे तसेच वॉटरग्रेस मुकादम प्रभाकर सोये, श्री.बिऱ्हाडे, संदीप शर्मा, पिंटू कोळी, ५० कामगारांचा समावेश होता.