साईमत, बोदवड : प्रतिनिधी
तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तालुका स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून ‘राज्य रयतेचे-जिजाऊंच्या शिवबाचे’ अंतर्गत १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान ‘स्वराज्य सप्ताह’ आयोजित केला आहे. त्यात विविध उपक्रम साजरे करण्यात येत आहे. याचनिमित्त बोदवड शहरांमध्ये उजणी रस्त्यावरील जिजाऊ बाल उद्यानमधील स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
शहरात तसेच गावागावात मुख्य चौकात स्वराज्य पताका, झेंडे, बॅनर लावून शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनाचा एक भाग म्हणून स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम राबवून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मोहिमेत तालुकाध्यक्ष निवृत्ती ढोले, कार्याध्यक्ष संतोषसिंग राणा, संजय काकडे पाटील, गणेश पाटील, चेतन तायडे, गजानन बेलदार, दीपक खराटे, गणेश सोनवणे, अरुण मोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.