सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात सफाई कर्मचाऱ्यांना मिळाला आरतीचा मान

0
31

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

शहरातील टिळक चौक येथील टिळकांच्या हस्ते स्थापन झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (वर्ष -१०३) हे शतक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. आज स्वच्छतेला आपण प्राथमिक स्थान देतो. तसेच प्रत्येक घरात सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिले कचरागाडी आली का किंवा ‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल’ हे गाणे रोज ऐकल्यावर आपल्या घरातील, दुकानातील किंबहुना परिसरातील कचरा टाकत असतो. त्यामुळे आपले परिसर स्वच्छ राहण्यासाठी खूप मदत होते. परंतु हे कार्य करत असताना एक घटक नेहमी कोणाच्या लक्षात नसतो तो म्हणजे “सफाई कर्मचारी” होय. त्याच सफाई कर्मचाऱ्यांना चाळीसगावातल्या सगळ्यात जुन्या मानाच्या गणपती मंडळात आरतीसाठी आमंत्रित करुन आरतीचा मान देण्यात आला.

यावेळी अपेक्षेपेक्षा जास्त कर्मचारी वर्ग आणि त्यांचा परिवार मंडळात आरतीसाठी उपस्थित होता. मंडळामार्फत प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विराज पुरकर, उपाध्यक्ष सागर वाघ, सचिव गणेश खैरनार, खजिनदार चेतन सराफ आदी उपस्थित होतेे. यशस्वीतेसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पियुष गुप्ता यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here