साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथून जवळील सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील मल्हारगडावरील पुरातन पाण्याच्या कोरीव दगडी टाक्यांची सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने मोहीम घेऊन त्यातील मोठमोठाले गवत गाळ दगड काढून साफसफाई स्वच्छता करण्यात आली. आता काही दिवसांनी पावसाळा सुरू होणार असल्याने स्वच्छ केलेल्या टाक्यांमध्ये यावर्षी पडणाऱ्या पावसाचे चांगले पाणी साचेल. तसेच त्यातील गाळ काढण्यात आल्याने पाण्याची क्षमता वाढेल. या उद्देशाने ही स्वच्छता मोहीम घेण्यात आली. पाण्याच्या साठ्यामुळे वर्षभर परिसरातील वन्यप्राणी तसेच किल्ल्यावर येणाऱ्या दुर्गप्रेमी आणि पर्यटकांना पिण्यासाठी येथे मुबलक पाणी उपलब्ध होते. म्हणूनच हा उपक्रम सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्यावतीने राबविण्यात आला.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे, ॲड. रणजीत पाटील, मोहीम प्रमुख सचिन पाटील, गजानन मोरे, जितेंद्र वाघ, योगेश शेळके, रवींद्र दुशिंग, गणेश (पप्पू) पाटील, नाना चौधरी, राहुल पवार, संभाजी पाटील, भाऊसाहेब पाटील, विजय कदम, विलास चव्हाण, वाल्मीक पाटील, सचिन देवरे, बबलू चव्हाण, अभिषेक गुंजाळ, मोहन भोळे, ललित चौधरी, दर्शन चौधरी, नाना अहिरे, मयूर भागवत, नृतेश भागवत, आयुष माळी, भानुदास बोरसे, शेखर आगोणे, सागर रोजेकर, गिरीश भामरे, आदींनी सहभाग नोंदविला.



