भोपाळ ः
सातवीत शिकणाऱ्या एका १३ वर्षांच्या मुलावर शाळेच्या हॉस्टेलमध्ये बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. गंभीर बाब म्हणजे हा प्रकार उघड झाल्यानंतर तक्रार करण्यासाठी शाळेत आलेल्या मुलाच्या पालकांना भेटायलाही शाळेच्या मुख्याध्यापकांनी नकार दिला. अखेर पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर विकृत शिपायाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे.
सतना जिल्ह्यातल्या सरस्वती विद्यापीठ उच्च माध्यमिक निवासी विद्यालयात ही गंभीर घटना घडली. शाळेचा ४३ वर्षीय शिपाई रवींद्र सेन याने शाळेतल्या एका सातवीत शिकणाऱ्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघड झाल्यानंतर परिसरात आणि शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा रेवा जिल्ह्याचा रहिवासी आहे.