वरणगावात किरकोळ कारणावरून हाणामारी

0
73

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी

शहरातील विकास कॉलनीत किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये सहा जण जखमी झाले असुन दोन्ही गटांनी पोलीस ठाण्यात परस्परांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना शनिवारी रात्री घडली होती. घटनेची पोलीस ठाण्यात उशिरा फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, शहरातील विकास कॉलनीत एकाच समाजातील दोन गटात जुन्या किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी शेख नजर शेख मज्जिद (रा. विकास कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दानिश अली, मुजाहिद अली, जाकीब अली कमर अली, जुबेर अली, मजहर रहीम शेख, मझहर तय्यब अली, ऐसान डॉक्टर, इरफान अली, नजीर अली, फिरोज शेख जाकीर अली, जुनेद (सर्व राहणार गौशिया नगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या गटातील जुबेर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अरबाज सय्यद, अज्जू शेख, समीर शेख, मजल शेख, भाईजान समीर, मुजाहिद सय्यद, साहिल सय्यद, शाहीर सय्यद, मुक्तार शेख ताबीज सय्यद, शोएब अंगड हे (सर्व रा. वरणगाव) यांनी चाकू, रॉड, फायटर, विटा, दगड यांनी मारहाण करून जुबेर व कमर अली व अकिल यांना जखमी केले आहे.

घटनेतील दोन्ही गटाच्या सहा जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. घटनेची पोलिसात नोंद होताच मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. तपास वरणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, हवालदार नागेंद्र तायडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here