तेरा जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
देवीच्या विसर्जन मिरवणुकीत धक्काबुक्की लागण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना सोमवारी, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. त्यात तेरा जण जखमी झाले आहे. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची धक्कादायक घटना एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथे घडली.
प्राप्त माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथे देवीच्या विसर्जन मिरवणुकीत धक्काबुक्की लागण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. त्यात दोन्ही गटातील १३ जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या सर्वांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यावेळी दोन्ही गट पुन्हा रुग्णालयात समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांना पाचारण केले होते.
यासंदर्भात एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती मोहन सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथे जुन्या वादातून ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता देवीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये धक्काबुक्की करत दोन गटात तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटातील १३ जखमी झाले आहेत. त्यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दोन्ही गटातील जखमी झालेल्या व्यक्तींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. दरम्यान, यावेळी दोन्ही गट समोरासमोर आल्याने पुन्हा वाद निर्माण झाला. यावेळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांना पाचारण केले होते. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण आणली. त्यानंतर जखमींवर उपचार करण्यात आले. यासंदर्भात उशिरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद झालेली नव्हती. या घटनेमुळे खेडी कढोली गावात खळबळ उडाली आहे.
दोन्ही गटातील १३ जण जखमी
दोन्ही गटातील जखमी १३ जणांमध्ये प्रकाश सिताराम सोनवणे (वय २७), सोनान नारायण सोनवणे (२०), संदीप सिताराम सोनवणे (३०), ऋषिकेश विठ्ठल सोनवणे (३०), संतोष ऋषिदास सोनवणे (२०), पुरुषोत्तम मोहन सोनवणे (३०), किरण युवराज सोनवणे (४०), नितीन अरुण सोनवणे (२८), अरुण लहू सोनवणे (४९), मंगलाबाई सुरेश सोनवणे (५७), युवराज लहू सोनवणे (६०), दुर्गेश एकनाथ सोनवणे (३२), राहुल मोहन सोनवणे (वय ३५) यांचा समावेश आहे.