शहरातील सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार

0
23

साईमत जळगाव प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यात टोळी करून वेगवेगळे गंभीर गुन्हे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दोन वर्षांकरिता जिल्हा हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे.

याबाबत माहिती अशी की, आशुतोष उर्फ आशु सुरेश मोरे (वय-२१, रा. एकनाथ नगर रामेश्वर कॉलनी) आणि (दीक्षांत उर्फ दादू देविदास सपकाळे (वय-१९ , रा, यादव देवचंद हायस्कूल जवळ मेहरूण) त्यांच्यावर एमआयडीसी आणि शनीपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे ८ गुन्हे दाखल आहे. जळगाव शहरात व जिल्ह्यात ठिकठिकाणी दहशत पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे निर्माण वातावरण तयार करण्याचे काम हे दोन्ही गुन्हेगार करत होते.त्यांच्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आले होते. तरी देखील त्यांच्यामध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सय्यद, साईनाथ मुंडे, जमीन शेख आणि इम्तियाज खान यांनी गुन्हेगार आशुतोष सुरेश मोरे आणि दीक्षांत देविदास सपकाळे या दोघांविरोधात हद्दपार करण्याचे अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर करण्यात आला होता.सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित केली.

त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अहवालाचे अवलोकन करून दोघांना दोन वर्षाकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश केले. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर हद्दपारचे कारवाई केली आहे, यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम आणि पोलीस कॉन्स्टेबल सुनील दामोदरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here