साईमत मुंबई प्रतिनिधी
स्वच्छ भारत पंधरवड्यानिमित्त दि.15 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता ही सेवा (SHS) थीम “कचरामुक्त भारत” उपक्रम आयोजन करण्यात आले आहे. पंधरवडयानिमित्त पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मार्फत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. त्यांचाच एक भाग म्हणून “01 तारिख, 10 वाजता, एक घंटा,” दि.01 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.00 वा राज्यातील प्रत्येक गावात महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात सुमारे 56,786 उपक्रमांचे ग्रामीण भागात नियोजन करण्यात आले असून महाश्रमदानाकरिता सर्व नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आवाहन केले आहे.
सदर पंधरवड्यानिमित्त दैनंदिन स्वच्छता विषयावर उपक्रम राबविण्याबाबत जिल्ह्यांनी नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने राज्यात सद्यस्थितीत 19,461 उपक्रम राबविण्यात आले असून सुमारे 95,84,680 नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे राज्यात स्वच्छतेचे जनआंदोलन उभारले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्याने राज्याच्या प्रशासनाबरोबर ग्रामपंचायती व नागरीकांचा सहभाग मोलाचा आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाण, शासकीय इमारत, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानक, बसस्थानके, खुल्या जागा साफसफाई, कचरा संकलन व वर्गीकरण, ग्रामस्थांच्या सहभागाने नदी, समुद्र किनारे, नाले काठावरील व तळ्यातील प्लॅस्टिक कचरा गोळा करणेबाबत मोहिम राबवावयाची आहे. सदर स्वच्छता मोहिमेत राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, महिला बचत गट सदस्य, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वंयसेवी संस्था, युव ग्रुप, ग्रामस्थ यांनी मोठया प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
