महानगरपालिकेला कर भरुनही नागरी सुविधांचा अभाव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
पिंप्राळा परिसरातील प्रल्हाद नगरातील गटारी, रस्ते, पथदिवे,ओपन स्पेसला सरंक्षक भिंत बांधून मिळावे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी पिंप्राळा परिसरातील वार्ड दहाच्या नगरसेविका शोभाबाई बारी यांना रविवारी नागरिकांनी साकडे घालून आम्ही महानगरपालिकेला कर भरुनही नागरी सुविधांचा अभाव आहे.
त्यामुळे त्वरित सुविधा करुन द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. शोभाबाई बारी यांचे चिरंजीव अतुल बारी यांना प्रल्हाद नगरमधील नागरिकांनी विविध समस्यांबाबत निवेदन दिले. अतुल बारी यांनी आ.सुरेश भोळे यांच्या निधीतून रस्ते व गटारी करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देतांना अपर्णा निकम, सविता पाटील, अंजली बडगुजर, मंगलाबाई पाटील, मीना पाटील, दीपाली चौधरी, संगीता जाधव, प्रिया वाल्हे, पूजा वाल्हे, शैलजा आडेकर, पूजा सोनार, अर्चना पाटील, रूपाली बडगुजर, विजया धर्माधिकारी, विमलबाई इंगळे,जितेंद्र पिंगळे, भागवत जाधव, उमेश पाटील, अशोक पाटील, गजानन बडगुजर, भागवत पाटील, पवन पाटील, सागर पाटील, प्रफुल वाल्हे, किरण बिऱ्हाडे, विनोद सोनार, राजू बडगुजर, दिनकर बडगुजर, कुंदन बडगुजर, परमेश्वर धर्माधिकारी, किरण विश्वकर्मा आदी उपस्थित होते.