Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»नवापूर, खांडबारा येथे चोर मचाये शोर…!
    क्राईम

    नवापूर, खांडबारा येथे चोर मचाये शोर…!

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, नवापूर, प्रतिनिधी

    तालुक्यातील खांडबारा गावातील आठवडे बाजारात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दहशत कायम आहे. त्यामुळे चोरटे आठवडे बाजारात पोलिसांना खुले आव्हान देत असल्याचे दिसून येत आहे. खांडबारा येथे आठवडे बाजारात चोरीच्या घटनांना आळा घालण्यात स्थानिक पोलीस अपयशी ठरल्यामुळे चोरटे सक्रिय झाले आहेत. वारंवार आठवडे बाजारात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कधी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तर कधी चेन चोरट्यांकडून लंपास केले जात आहे. मागील काही महिन्यांपासून मोबाईल चोरटे तसेच काही महिलाही चोरी करत असल्याचे समोर आले आहे. तसेच नवापूर शहरात मोटरसायकल चोरीचे सत्र सुरु आहे.

    शहरातील विविध भागात मोटरसायकल चोरीला गेल्या आहेत. खांडबारा येथील पटेल किराणा दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये एका चोरट्याने लंपास घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. घटनेत संबंधित चोरटा एका पिशवीचा आडोसा घेऊन मोगराणी गावातील किराणा व्यावसायिक किराणा खरेदी करत असतांना त्यांच्या खिशातून मोबाईल लंपास करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. परंतु, मोबाईल चोरी करत असतांना मोबाईल हातामधून घसरून खाली कोसळल्याने व्यक्तीला चोरी करत असल्याचे लक्षात आले. चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निसटण्यात यशस्वी झाला.

    पोलिसांना खाकीचा दरारा दाखवावा लागणार
    मोबाईल चोरीला गेला नसला तरी आठवडे चोरीच्या घटनांमध्ये बाजारात वाढ झाली आहे. स्थानिक ग्रामस्थ परिसरातील शेतकरी बाजारहाट करण्यासाठी आलेल्या नागरिकांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे पोलिसांना पुन्हा एकदा खाकीचा दरारा दाखवावा लागणार आहे. नवापूर व खांडबारा परिसरातून चोरांचा तपास पोलिसांनी तात्काळ लावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora: पिंपळगाव हरेश्वरात किरकोळ वादातून तरुणावर बेशुद्ध हल्ला

    February 25, 2026

    Erandol:एरंडोल तालुक्यात हनुमंत खेडेत लग्नसमारंभात हाणामारी

    February 25, 2026

    Jalgaon:अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.