चोपडा तालुका शारीरिक शिक्षण, क्रीडाशिक्षक महासंघाची सभा उत्साहात

0
33

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात चोपडा तालुका शारीरिक शिक्षण आणि क्रीडाशिक्षक महासंघाची सभा नुकतीच उत्साहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी महासंघाचे कार्याध्यक्ष राजेश जाधव होते.

याप्रसंगी चोपडा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा ग.स.सोसायटीचे संचालक मंगेश भोईटे, चोपडा तालुका क्रीडा संयोजक राजेंद्र आल्हाट, चोपडा तालुका क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष अशोक साळुंखे, क्रीडाशिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, जिल्हा संघटक प्रा.ईकबाल मिर्झा, क्रीडाशिक्षक महासंघाचे सहसचिव देविदास महाजन, अनिल माकडे, यावल तालुका क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक के.यु.पाटील, धरणगाव तालुका क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष के.एस.पाटील, सचिव सचिन सूर्यवंशी, एरंडोल तालुका क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव सचिन महाजन, जळगाव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.रणजित पाटील, चोपडा तालुका युवा महासंघाचे अध्यक्ष प्रा.अमोल पाटील, निलेश पाटील, गिरीश महाजन, विजय विसपुते, रोहिदास महाले, हेमंत माळी, प्रा.जितेंद्र ओस्तवाल आदी उपस्थित होते.

प्रारंभी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण ज्येष्ठ संघटक प्रा.ईक्बाल मिर्झा यांनी केले. सभेपूर्वी धरणगाव येथील स्व. क्रीडा शिक्षक मनोज परदेशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रशांत कोल्हे, राजेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. एक्सलंट पुरस्काराने मंगेश भोईटे यांना सन्मानित केल्याबद्दल जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघातर्फे त्यांचा सत्कार केला.

जिल्हा शारिरीक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे सहसचिव देविदास महाजन यांनी चोपडा तालुका शारिरीक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाची नवनियुक्त कार्यकारिणीची निवड उपस्थितांच्या मंजूरीने जाहीर केली. त्यात अध्यक्षपदी अशोक साळुंके, उपाध्यक्षपदी एस.पी.बाविस्कर, जे.व्ही.महाजन, सचिव जगदीश जाधव, सहसचिव आर.टी.पाटील, नरेंद्र महाजन, सल्लागार गुणवंत वाघ, साहेबराव पाटील, महिला सदस्या अनिता पाटील, पूजा चौधरी, सदस्यपदी विजय पाटील, आर.एम.मोरे, आर.एस.बडगुजर, भुपेंद्र पाटील यांची सर्वानुमते निवड जाहीर केली. प्रास्ताविक राजेंद्र आल्हाट, सूत्रसंचालन मंगेश भोईटे तर आभार नवनियुक्त अध्यक्ष अशोक साळुंके यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here