चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाचा ज्येष्ठ नागरिक दिन साजरा

0
18

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, हक्क, अधिकारविषयी कायदेशीर मार्गदर्शन

साईमत/चोपडा/प्रतिनिधी :

चोपडा न्यायालयाचे विधीज्ञ एस.डी. पाटील यांनी चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, हक्क व अधिकार विषयक कायदेशीर मार्गदर्शन केले. सध्या ज्येष्ठ नागरिकांच्या निर्माण होणाऱ्या समस्यां या नैतिक मूल्यांची होणारी घसरण, ज्येष्ठांविषयी अनादर व वाढत जाणारी विभक्त कुटुंब व्यवस्था अशा विविध कारणांमुळे होत असल्याचे निरीक्षण न्यायालयांनी नोंदविल्याचे संघाचे विधी तज्ज्ञ ॲड. व्ही.बी.पाटील यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात सेवानिवृत्त प्रा. व्ही.के.पाटील यांनी ज्येष्ठांच्या व्यथा मांडल्या तर व्ही. एच. करोडपती यांनी ज्येष्ठांच्या समस्या व योजनांविषयी माहिती दिली. कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख, उपाध्यक्ष जे.एस. नेरपगारे, सहसचिव इंजि व्ही. एस. पाटील, कोषाध्यक्ष दिलीपराव पाटील, माजी अध्यक्ष व्ही. एच. करोडपती, माजी उपाध्यक्ष एम.डब्ल्यू.पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष पाटील, मधुकर बाविस्कर, जगन्नाथ पाटील, आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह संघाचे अनेक सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक, सूत्रसंचालन तथा आभार संघाचे सचिव विलास पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here