साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथील ‘महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान’ संस्थेतर्फे ‘बेसिक्स ऑफ कन्फेशनरी टेक्नॉलॉजी’ ह्या पुस्तकाच्या लेखिका प्रा.सोनल नरेश चौधरी यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड. संदीप पाटील होते. यावेळी तापी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा माजी आ.कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख पाटील, महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव स्मिता पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती भारती बोरसे, चोपडा सूतगिरणीचे व्हा.चेअरमन प्रल्हादराव पाटील, ह.भ.प. महंत अशोकदास महाराज, चोपडा नगर परिषदेचे माजी गटनेते जीवन चौधरी, माजी नगरसेविका राधाताई देशमुख, माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, चोपडा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, चोपडा काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक प्रा. नंदकिशोर सांगोरे, ह.भ.प.बापू महाराज लासुरकर, धरणगावचे ॲड. वसंतराव भोलाणे, एन.डी.महाजन उपस्थित होते.
सुरुवातीला स्व.श्रीमती पार्वताआई यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित पाहुण्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच चोपडा साखर कारखान्याचे संचालक, बाजार समितीचे संचालक, शेतकरी संघाचे संचालक यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्या वाचस्पती टी.एम. चौधरी यांनी प्रा. सोनल चौधरी यांच्या प्रकाशित पुस्तक संबंधी माहिती दिली. पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथील न्यू इंडिया पब्लिशिंग एजन्सी प्रकाशन संस्थेमार्फत जून २०२३ मध्ये केले आहे. फूड टेक्नॉलॉजी शिकणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. साखर व दूधाबद्दलची तंत्रशुद्ध माहिती सोप्या आणि कमी शब्दात शब्दबद्ध केली असल्याचे नमूद केले. संदर्भ ग्रंथ म्हणून पुस्तकाचा वापर फूड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी आदर्श शिक्षक तथा समाजरत्न टी.एम.चौधरी यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकार रमेश पाटील यांचा सहावा कवितासंग्रह प्रकाशित झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यांचा झाला सत्कार
यावेळी ॲड.संदीप पाटील, माजी आमदार कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख पाटील यांनी सोनल चौधरी यांच्या कार्याबद्दल कौतुक केले. यावेळी तिघांच्या हस्ते सहकारी संस्थांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी सूतगिरणीचे संचालक सर्वश्री चेअरमन कैलास पाटील, व्हाईस चेअरमन प्रल्हाद पाटील, संचालक सर्वश्री चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील, शशिकांत शांताराम पाटील, साहेबराव पाटील, संजय पाटील, रामदास चौधरी, गौरीलाल जैन, विनायक पाटील, श्रावण पाटील, देविदास सोनवणे, भारती बोरसे, कमलबाई पाटील, सुनील बागुले, रमेश सोनवणे, अमृतराव वाघ, कैलास बाविस्कर, बाजार समितीचे माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे, संचालक डॉ.अनिल पाटील, साखर कारखानाचे संचालक गोपाळ धनगर, शरद धनगर, शिवाजीराव देसले, चोपडा शेतकी संघाचे संचालक देविदास धनगर, बाळकृष्ण सोनवणे या मान्यवरांचा सत्कार केला. सूतगिरणीच्या निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या सर्व नेते, कार्यकर्त्यांचे के.डी.चौधरी, देवकांत चौधरी यांनी आभार व्यक्त केले. उपस्थितांचे प्रिया चौधरी यांनी आभार मानले.