मुलासह लेकही करताहेत पीएच.डी.
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
वडिलांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारी लेक चित्रांगा अनिल चौधरी यांनी पीएचडी प्राप्त केली आहे. ‘इम्पॉवरमेंट ऑफ वुमेन विथ रेफ्रेंस टू सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस-ॲन ऐनालिटिकल स्टडी’ विषयावर त्यांनी संशोधन प्राप्त केले आहे. त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षापासून मोफत क्लासेस शिकविणे किंवा इतर ठिकाणी जॉब केले. त्यांना ४० वर्षाचा अनुभव आहे. त्या सध्या जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विधी व माहितीचा अधिकार विभागात कार्यरत आहे. त्यांना विद्यापीठाने विधी विषयात पीएच.डी. जाहीर केली आहे.
जळगाव येथील एस.एस.मणियार विधी महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉ. विजेता सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रांगा यांनी वरील विषयावर संशोधन करुन शोध प्रबंध सादर केला होता. एक मुलगी, सासू, आजी, जॉब असे सर्व सांभाळून त्यांनी सुयश प्राप्त केले. त्यांची मुलगी साक्षी चौधरी ही पीएचडी करत आहे. त्यांचा मुलगा प्रितेशही पीएचडी करत आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांचे लैंगिक शोषण किंवा समस्या ह्या चित्रांगा यांनी समुपदेशाच्या माध्यमातून अनुभवल्या आहे. त्यामुळे त्या समस्या कशा दूर करता होतील, ह्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे.
यांचे लाभले सहकार्य
चित्रांगा चौधरी यांना एस.एस.मणियार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.युवाकुमार रेड्डी यांचे मार्गदर्शन तसेच डॉ.नितीश चौधरी (नंदुरबार), डॉ.साजीदा शेख (धुळे) आणि जळगाव विधी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. डॉ.विजय बहिरम (धुळे) यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.