लोकमान्य विद्यालयात “चित्रदुर्गा”उत्सव संपन्न

0
38

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी 

लोकमान्य विद्यालय अमळनेर मध्ये राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत पर्यावरण पुरक उपक्रम म्हणुन “चित्रदुर्गा” ची दररोज चलस्थापना करण्यात आली.

विद्यालयात नवरात्रीचे नऊ दिवस विद्यालयाचे कला शिक्षक श्री.मनोहर महाजन यांनी शाळेच्या फळ्यावर रंगीत खडू च्या साहाय्याने,श्री तुळजाभवानी (तुळजापूर),श्री महालक्ष्मी (कोल्हापूर)श्री.रेणुका माता(माहुर गड)श्री अंबादेवी (अमरावती)श्री रेणुका माता चांदवड)श्री भुमि माता(श्री मंडळ ग्रह मंदिर अमळनेर),राज राजेश्वरी पेडकाई माता ,श्री सप्तशृंगी देवी (वणी गड)श्री एकवीरा देवी (धुळे),याची चित्र काढून दररोज आरती व विधीवत पुजा करण्यात आली.या पर्यावरण पुरक धार्मिक उपक्रमास , जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक.श्री.नितिनजी‌ बचाव साहेब, जळगाव, यांनी भेट देऊन उपक्रमांचे कौतुक केले.या पर्यावरण उपक्रमांची संकल्पना व चित्र-श्री.मनोहर महाजन,(कला शिक्षक)याची तर , मार्गदर्शन-श्री.रविंद्र लष्करे मुख्याध्यापक,श्री.राजेंद्र निकुंभ सर यांनी केले.उपक्रमास राष्ट्रीय हरित सैनिक विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी साह्य केले.लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस-मा.श्री.विवेकानंद भांडारकर,मा.प्रा.अरविंद फुलपगारे(कार्यध्यक्ष लो.शि मंडळ)मा.प्रा डाॅ.प्र.ज.जोशी(चेअरमन-लो.वि) यांनी उपक्रमांचे कौतुक केले.तसेच सोशल मीडिया च्या माध्यमातून पालक,व जिल्हा भरातुन खुप चांगल्या प्रतिक्रिया नोंदविल्या गेल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here