साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील प्रताप महाविद्यालयाचे तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवस विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर आयोजित केले आहे. शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक आसाराम पंडित पाटील, प्रा. डॉ.ए. बी.जैन यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.ए.बी.जैन होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे, कवी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे संचालक प्रा.डॉ. सचिन नांद्रे, दत्त संस्था चिमणपुरी पिंपळेचे अध्यक्ष निंबा चौधरी, महिला लोकनियुक्त सरपंच वर्षा पाटील, उपसरपंच शोभाबाई पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, रासेयोचे विभागीय समन्वयक डॉ.दिनेश पाटील, सिनेट सदस्य प्रा.डॉ.संदीप नेरकर, प्राचार्य डॉ.रवींद्र सोनवणे, उपप्राचार्य डॉ.विजय मांटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.हेमंत पवार, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.भाग्यश्री जाधव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.सुनील राजपूत तसेच गोकुळ पाटील, संतोष चौधरी, भगवान पाटील, रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.
शिबिरात आठवडाभर दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचा असणार आहे. सकाळ सत्रात स्वच्छतेचा जागर, व्यायाम केला जाईल. तसेच स्वच्छता, मतदान, रक्तदान, पाणी व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्त अभियान, पर्यावरण व्यवस्था आणि आरोग्यावर जनजागृती करण्यात येणार आहे. सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री जाधव तर आभार प्रा.सुनील राजपूत यांनी मानले.