उन्हाळ्याच्या सुटीत  आपल्या आई-वडिलांना शेतीकामात चिमुकल्यांची मदत

0
13
साईमत सोयगाव प्रतिनिधी
वातावरणाच्या चढ-उतारामुळे तसेच बदलत्या हवामान बदलामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरिपपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत.
वादळी पावसाने काही शेतकऱ्यांच्या शेतात अजून मका, ज्वारी, बाजरी हे रब्बी चे पिके उभी आहेत तर काही शेतकऱ्यांच्या पिकांची कापणी होऊन शेतात पडलेली आहेत तालुक्यात गेल्या वर्षीच्या कापूस बाजार भाव वाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कपाशी परदड वर भर दिला होता मात्र शेतकऱ्यांना मागच्या वर्षाच्या तुलनेत या हंगामात कमी भावात कापूस विकावा लागला तर काही शेतकऱ्यांनी भाववाढ होईल या आशेवर कापूस घरात साठवून ठेवला आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे.
खरीप पूर्व हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांना शेतीकाम उरकून घेण्याची घाई लागली आहे आपल्या  आईवडिलांना शेतातील कामात हातभार म्हणून उन्हाळाच्या सुटीत घरी असलेले चिमूलकले देखील मदत करीत आहेत सोयगाव तालुक्यात कापूस परठ्या काढणीला वेग आला असून शाळकरी चिमुकली शेतात परठ्या जमा करतांना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here