उद्बोधन, प्रश्नोत्तरे अन् खेळांच्या माध्यमातून विषयाची दिली माहिती
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील मालदाभाडी येथील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय युनीसेफ ३, एकात्मिक महिला व बालविकास, जळगाव व सानेगुरुजी फाऊंडेशन, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त अभियान सुरू आहे. यासंदर्भात शाळेतील विद्यार्थ्यांसह पालकांसाठी चर्चासत्र आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी प्र. मुख्याध्यापक एस.आर.शिकोकारे होते. यावेळी के.आर.महाजन, जी.टी.पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमातून बालविवाहामुळे शारीरिक व मानसिक ताणतणावाबाबत स्वयंसेवक भाग्यश्री जैन यांनी माहिती दिली. तसेच रजनी जैन यांनी छोट्या छोट्या खेळांच्या माध्यमातून ताण कसा येतो, हे पटवून दिले. यशस्वीतेसाठी ए. बी. पाटील, आर. एल. कोळी, एन.जी.पाटील, एम. एस. जैन, सनील जैन यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विजय सैतवाल तर आभार एन.एस. पाटील यांनी मानले.