Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»मातोश्रीबाहेर निधन झालेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात
    मुंबई

    मातोश्रीबाहेर निधन झालेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात

    SaimatBy SaimatJuly 13, 2022Updated:July 13, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह ठाणे प्रतिनिधी 

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवसेनेतमोठी फूट निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षातील गळती थांबवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) सातत्याने मातोश्री आणि शिवसेना भवन येथे शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर (Matoshri)आलेल्या शहापूर तालुक्यातील कसाऱ्यातील सेना पदाधिकारी भगवान काळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर मातोश्री आणि शिवसेनेकडून कुठलीही विचारपूस झालेली नव्हती. ही बाब माहिती पडताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळे कुटुंबियांच्या मदतीला धावून गेले.

    या पदाधिकाऱ्याच्या कुटूंबियांना ३ लाख रुपयांची मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यातील १ लाख रुपयांची मदत माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि साईनाथ तारे यांनी काळे कुटूंबियांना सुपूर्द केली. तसेच त्यांच्या दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्व देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वीकारले आहे.

    कसारा येथील वाशाळा गावातील पदाधिकाऱ्यांसोबत भगवान काळे हे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या बैठकीला गेले होते. बैठक सुरू असतानाच अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काळे यांना कलानगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे काळे कुटूंबियांचा एकमेव आधार हरपला होता. भगवान काळे यांचा मृत्यू झाल्याची बातमी सर्वच माध्यमांमध्ये झळकली होती. मात्र तरीही या कुटुंबाचे साधे सांत्वन करण्यासाठी शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी नाशिक दौऱ्यावर होते. येताना जाताना ते कसारामार्गेच नाशिकला गेले. परंतु, तरीदेखील त्यांना क्षणभर थांबून काळे कुटुंबियांचे सांत्वन करावे असे वाटले नाही, याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांना देखील आश्चर्य वाटले. एवढच काय मातोश्रीवरून काळे कुटुंबाच्या सांत्वनासाठी साधा संपर्कही कुणी केला नाही.

    ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच यांनी त्यांचे सहकारी शिवसेना ठाणे ग्रामीण सचिव साईनाथ तारे, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना पाठवून काळे कुटुंबाला तातडीची १ लाखाची मदत केली तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दूरध्वनी वरून मयत भगवान काळे यांच्या कुटुंबासोबत संपर्क करून अजून दोन लाख रुपये मदत व मुलांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याचे जाहीर केले. या दुःखद प्रसंगात आपण काळे कुटूंबियांचा सोबत असून त्यांना लागेल ती सर्व मदत करायला तयार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळे कुटूंबाला सांगितले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Big Breaking! राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जि.प.–पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू

    January 13, 2026

    Girish Mahajan on Raj thackeray : राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका – “निवडणूक आली की मराठी अस्मिता आठवते!”

    January 12, 2026

    मोठी बातमी! मुंबई निवडणूक प्रचारात जीवघेणा हल्ला, वांद्र्याचे ज्ञानेश्वर नगर हादरले

    January 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.