साईमत / जळगाव / प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ समिती गठीत करण्यात आली आहे. समितीची बैठक दि.१२ ऑगस्ट रोजी मनपा प्रशिक्षण इमारतीतील माळा क्रमांक 13 येथे आ. राजूमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी आयुक्त तथा प्रशासक झानेश्वर ढेरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्याच्यानंतर समिती अध्यक्ष तथा आ. राजूमामा भोळे यांच्या संमतीने बैठकीस सुरुवात झाली. यावेळी सदस्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ऑनलाईन केलेल्या रजिस्ट्रेशन व छाननी केलेले अर्ज याबाबतची संपूर्ण माहिती पीपीटी द्वारे देण्यात आली.
मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेच्या अंमलबजावणी कामी नारी शक्ती दूत मोबाईल ॲप द्वारे ऑनलाइन भरलेल्या अर्जांची संख्या व ऑफलाईन भरलेल्या अर्जांची संख्या अशी एकूण 39 हजार 155 अशी असून त्यापैकी एकूण छाननी झालेल्या अर्जांची संख्या 39,187 इतकी करण्यात आलेली आहे . त्यापैकी 1850 तात्पुरते अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. व एकूण 37 हजार 153 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
यावर अध्यक्ष तथा आ. राजूमामा भोळे यांनी असे सांगितले की, तात्पुरते रिजेक्ट झालेले अर्जांमधील त्रुटीच्या पूर्तते संदर्भात लाभार्थ्यांशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून त्यांच्याकडून त्रुटींमधील पूर्तता पूर्ण करून घेण्यात यावी. तसेच या लाभापासून कोणतीही महिला लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी
यावर मनपा प्रशासनाकडून सदरचे तात्पुरते रिजेक्ट झालेले अर्जांवर महिला लाभार्थ्यांकडून त्रुटी दूर करून घेऊन सदरील तात्पुरते रिजेक्ट झालेले अर्ज लवकरात लवकर मंजूर करून घेण्याची कार्यवाही करण्यात येईल .तसेच यापुढे येणारे ऑनलाइन रजिस्ट्रेशन द्वारे प्राप्त होणारे अर्जांवर त्या त्या वेळी कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात करण्यात येईल असे सांगण्यात आले. शहर अभियान व्यवस्थापक शालिग्राम लहासे आभार मानले.