साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
गुलामगिरीत पिचलेल्या या मातीतील लोकांची मने आणि मनगटे स्वातंत्र्यांच्या विचाराने पुन्हा जिवंत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रयत सेनेच्यावतीने शिवाजी घाट येथे गुरुवारी, ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश समन्वयक पी.एन.पाटील, भ्रष्टाचार निर्मूलन सेनेचे प्रदेशाध्यक्ष खुशाल पाटील, प्रा.चंद्रकांत ठाकरे, माजी नगरसेवक दीपक पाटील, शहराध्यक्ष छोटू अहिरे, मार्गदर्शक राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, शहर सहसंघटक दीपक देशमुख, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, शहर संघटक शिवाजी गवळी, प्रकाश गवळी, सुनील पवार, अजय माने, दीपक नागणे उपस्थित होते.