साईमत जळगाव प्रतिनिधी
येथील शिवाजीनगर भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची सुरक्षितता व कामकाजा संदर्भात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले, धनंजय चौधरी यांनी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची भेट घेतली.
यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ व जिल्हा प्रशासन यांच्या समनव्य बैठकीत छत्रपती शिवाजी नगर मित्र मंडळाकडून छत्रपती शिवाजी नगर भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक संबंधित विषय मांडण्यात आला. त्याची पुढील अंमलबजावणी करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले, सूरज दायमा, धनंजय चौधरी आदींमध्ये स्मारकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील उपाययोजना करण्यासाठी चर्चा झाली. या प्रसंगी छत्रपती शिवाजी नगर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.