साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील गडखांब येथील आश्रमशाळेचे उपशिक्षक चेतन किसन जाधव यांना पुणे येथे विद्यार्थी महादिक्षांत समारंभात वनस्पती शास्र विशारद पदवी बहाल करून सन्मान करण्यात आला.
नाशिक येथील वनस्पती विद्या मिशन संचलित सागर अहिरे यांच्या मार्गदर्शनाने वनस्पतीशास्त्र व वैदिक वास्तुविशारद यामध्ये पदवी प्राप्त वनस्पती व त्यांचे आपल्या जीवनातील विशेष महत्त्व याविषयी परिपूर्ण अशी माहिती प्राप्त करून देण्यात आली. प्रशिक्षणात ज्यांनी यश प्राप्त केले त्यांना यात पदवी बहाल करण्यात आली. हा विद्यार्थी महादिक्षांत समारंभ पुणे येथे आयोजित केला होता. समारंभाला महाराष्ट्र व भारतातील अनेक विद्यार्थ्यांनी वनस्पतीशास्त्र व वैदिक वास्तु विशारद यामध्ये पदवी प्राप्त करून प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह सागर अहिरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
वनस्पती विद्या मिशन अंतर्गत अनेक प्राचीन आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती तसेच वनस्पतींमुळे आपल्याला होणारे फायदे दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पती अशा वनस्पतींची माहिती पदवीमध्ये मिळाली. चेतन जाधव यांना अगोदरपासूनच वनस्पती शास्त्रात आवड आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या घरी रोपवाटीका सुंदर अशी बनविलेली आहे. त्यांना ही पदवी मिळाल्याने गडखांब आश्रमशाळेचे अध्यक्ष बापुराव खुशाल पाटील, मुख्याध्यापक दीपक पाटील, पारोळा येथील परिश्रम दिव्यांग मुलांच्या शाळेचे अध्यक्ष डॉ. योगेश महाजन, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मित्र परिवार यांनी चेतन जाधव यांचे कौतुक केले आहे.