साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील भडगाव रस्त्यालगतच्या लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात चाळीसगाव जेसीआय सिटीचा पदग्रहण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून भारतीय नौदलातील व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अमित महाजन, सहाय्यक वाहन निरीक्षक तुषार मुसळे, जेसीआय झोन अध्यक्ष जितेंद्र बोरा, झोन उपाध्यक्ष गौरव धाकराव, माजी अध्यक्ष जेसी अफसर खाटीक उपस्थित होते. व्यासपीठावर आयपीपी २०२३ धर्मराज खैरनार, २०२३चे अध्यक्ष ॲड. सागर पाटील, सचिव महेंद्र कुमावत, विद्यमान अध्यक्ष नरेंद्र शिरुडे, सचिव मनोज पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी डॉ. अमित महाजन यांनी जेसीआयच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या तर सुनील भोकरे यांनी जेसीआयच्या आजपर्यंतच्या कार्यकाळाबद्दल प्रशंसा व्यक्त केली. ॲड. सागर पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळाबद्दल माहिती दिली. पुढे सर्व मान्यवरांसमोर ॲड. सागर पाटील यांनी नरेंद्र शिरुडे यांना कॉलर व पिन देवून जेसीआय २०२४ सालचा अध्यक्ष पदाचा पदभार सोपविला. तसेच सचिव महेंद्र कुमावत यांनी विद्यमान सचिव मनोज पाटील यांना सचिवपदाची पिन लावून २०२३ चा जेसीआयचा सचिवपदाचा पदभार सोपविला. अध्यक्ष नरेंद्र शिरुडे यांनी पुढील उपक्रमांविषयी माहिती देवून नियोजन सांगितले.
समारंभास जेसीआयचे माजी अध्यक्ष झेडपी निलेश गुप्ता, झेडव्हीपी संजय पवार, गजानन मोरे, डॉ. शिरीष पवार, डी. के. चौधरी, सचिन पवार, खुशाल पाटील, देवेन पाटील, बालाप्रसाद राणा, मुराद पटेल उपस्थित होते. यशस्वीतेसाठी साहिल दाभाडे, कुणाल राणा, आकाश धुमाळ, चंद्रकांत ठाकरे, धिरज जैन, मयूर अमृतकार, आतिष कदम, वकार बेग, अमोल नानकर, सलमान खान, जगन्नाथ चिंचोले, मंगेश जोशी, आशुतोष खैरनार, सुवालाल सूर्यवंशी, निरज येवले, विजय भामरे, भास्कर पाटील, नितीन अमृतकार, आनंद गांगुर्डे, हृदय जैन तसेच सर्व जेसी परिवाराने परिश्रम घेतले. सुत्रसंचलन सचिन पवार तर आभार सचिव मनोज पाटील यांनी मानले.